Farm Mechanization

आजच्या काळात शेतकऱ्यांना प्रगत शेती करण्यासाठी आधुनिक कृषी यंत्राची गरज आहे.अशा परिस्थितीत बियाणे पेरणे पासून ते पीक काढणीपर्यंत कृषी यंत्र शिवाय शेतकरीबांधव कल्पनादेखील करू शकत नाही.अशाच प्रकारे पिक पेरणी चे काम सोपे करण्यासाठी सीड ड्रील मशीन उत्तम मानले जाते. या लेखामध्ये आपण काही सीड ड्रील मशीनच्या संबंधी सविस्तरपणे माहिती घेऊ.

Updated on 15 June, 2022 4:51 PM IST

आजच्या काळात शेतकऱ्यांना प्रगत शेती करण्यासाठी आधुनिक कृषी यंत्राची गरज आहे.अशा परिस्थितीत बियाणे पेरणे पासून ते पीक काढणीपर्यंत कृषी यंत्र शिवाय शेतकरीबांधव कल्पनादेखील करू शकत नाही.अशाच प्रकारे पिक पेरणी चे काम सोपे करण्यासाठी सीड ड्रील मशीन उत्तम मानले जाते. या लेखामध्ये आपण काही सीड ड्रील मशीनच्या संबंधी सविस्तरपणे माहिती घेऊ.

 सीड ड्रील मशीन म्हणजे काय?

एक आधुनिक कृषी यंत्र आहे,जे शेतकरी बांधव सहजपणे ट्रॅक्टर ला जोडून बियाणे पेरणीसाठी वापरतात.या यंत्राच्या साहाय्याने तुमच्या गरजेनुसार बियाण्याच्या अंतर, रेषा व इतर अनेक कामे शेतात केली जातात.

बियाणे ड्रील च्या मदतीने तुम्ही भात, बाजरी, भुईमूग, गहू, मका, वाटाणे, मसूर, सोयाबीन, बटाटा, कांदा, लसुन, सूर्यफूल, जिरे, हरभरा, कापूस इत्यादी पिकांची पेरणी सहज करू शकतात.

 बाजारातील प्रसिद्ध सात सीड ड्रील मशीन

शेतकरी बांधवांच्या गरजेनुसार भारतातील अनेक कंपन्या सीड ड्रील मशीन तयार करतात, परंतु एवढ्या कंपन्या सीड ड्रील तयार करत असूनही काही कंपन्यांची सीड ड्रिल मशीन शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत.ते खालील प्रमाणे….

1- खेडूत सीड ड्रील- हे बियाणे ड्रिल मशीन शेतकऱ्यांमध्ये खूप आहे. कारण ते शेतकऱ्यांच्या बजेटनुसार बाजारात उपलब्ध आहे आणि शेतकरी ते कुठेही सहजपणे कुठेही घेऊ शकतात. ही यंत्रे त्यांच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी आणि गुणवत्तेसाठी ओळखले जातात.

नक्की वाचा:खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बाजरी पिकाचे व्यवस्थापन, शेतकऱ्यांचे उत्पादन वाढणार

2- शक्तिमान मेकॅनिकल सिड ड्रिल- हे कृषी यंत्र  शेतकऱ्यांना सर्वाधिक आवडते कारण ते शेतात सर्वाधिक सुपीक उत्पादनात मदत करते तसेच हे 50 ते 70 एचपी क्षमतेसह शेतात कार्य करते तसेच गहू, राई, लुसेर्ण गवत, तांदूळ,ओट्स, वाटाणा, बारली, सोयाबीन,  मका, मोहरी इत्यादीसाठी शेतकरी याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात.

3- फिल्ड किंग डिस्क सीड ड्रिल-या यंत्राच्या मदतीने सर्व प्रकारच्या जमिनीत बियाणे पेरणे सोपे झाले आहे.ट्रॅक्टर मध्ये हि ते बसवणे खूप सोपे आहे. फिल्ड किंग डिस्क सीड ड्रिल मशीन तुम्हाला तीस ते 85 हॉर्स पावर क्षमतेत येते.

4- के एस ग्रुप सीड ड्रील-हे यंत्र प्रगत आणि आधुनिक पद्धतीने बियाणे पेरणी करते.हे कमी वेळेत बियाणे पेरण्याची परवानगी देते तसेच यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज नाही.

नक्की वाचा:Soyabien Crop:बऱ्याच प्रमाणात सोयाबीनची पाने पिवळी पडतात कारण…..

5- लँड फोर्स टर्बो सीडर( रोटो टिल ड्रिल )-हे बियाणे ड्रिल मशीन शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे कारण ते त्याच्या बजेटनुसार बाजारात उपलब्ध आहे आणि ते पूर्ण क्षमतेने शेतात दीर्घकाळ काम करते.

6- सोनालिका रोटो सीड ड्रील- हे सीड ड्रिल मशीन 25 एचपी मध्ये येते.हे शेतात कमी इंधन वापरासाठी ओळखले जाते.हे कमी वेळेत बियाणे पेरण्याची परवानगी देते.

 बाजारात सीड ड्रिल ची किंमत

हे सीड ड्रील मशीन सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत किफायतशीर असे आहेत.भारतीय बाजारपेठेत हे सर्व कृषी यंत्रे 40 हजार रुपयांपासून ते दीड लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

नक्की वाचा:महत्वाचे!जर पडला पावसाचा खंड तर अशा पद्धतीने करा सोयाबीन पिकाचे व्यवस्थापन, होईल नक्कीच फायदा

English Summary: thise six seed drill machine help to farmer is crop sowing
Published on: 15 June 2022, 04:51 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)