Farm Mechanization

कोरोणाच्या संकटामुळे लोकांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्याचा सर्वाधिक फटका गरीब शेतकऱ्यांना बसला आहे. अशा परिस्थितीत सरकार आणि अनेक कंपन्याही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.

Updated on 24 June, 2022 6:27 PM IST

 कोरोणाच्या संकटामुळे लोकांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्याचा सर्वाधिक फटका गरीब शेतकऱ्यांना बसला आहे. अशा परिस्थितीत सरकार आणि अनेक कंपन्याही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.

सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत तर TAFE सारख्या अनेक मोठ्या कंपन्यांनी गरीब शेतकऱ्यांना मोफत शेती करण्यासाठी ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले आहेत. कारण शेतीचे कोणतेही  काम ट्रॅक्टर शिवाय शक्य नाही.

अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या या मूलभूत गरजा लक्षात घेऊन विविध कंपन्यांनी देशातील बाजारपेठेत अनेक प्रकारचे ट्रॅक्टर आणले आहेत. त्यातील एक ट्रॅक्टर म्हणजे मिनी ट्रॅक्टर हे होय.

आजच्या लेखात आपण काही मिनी ट्रॅक्टर बद्दल माहिती घेणार आहोत जे शेतीच्या कामात उपयोगी पडतात. तसेच बाजारात अगदी किफायतशीर दरात उपलब्ध आहेत.

 किफायतशीर दरातील मिनी ट्रॅक्टर्स

1- युवराज-215 NXT- हा भारतातील पहिला 15 पावर युनिट ट्रॅक्टर आहे. महिंद्रा मिनी ट्रॅक्टर 15 एचपी सिंगल सिलेंडर कुल व्हर्टिकल इंजिन सह सुसज्ज आहे. ते 863.5 सी सी पावर जनरेट करते जे किफायतशीर आहे तसेच चांगली कामगिरी करते.

याव्यतिरिक्त ते शेतीच्या कामासाठी कॉम्पॅक्ट प्रचलित प्रदान करते. त्याचं एकंदरीत सुंदर डिझाईन केलेली असून महिंद्रा युवराज 215 NXT मिनी ट्रॅक्टर विशेषकरून बटाटा, कांदा, कापूस, ऊस,

आंबा आणि संत्री यासारखे फळे आणि भाजीपाला लागवडीसाठी तयार करण्यात आले आहे. त्याची किंमत दोन लाख 50 हजार ते दोन लाख 75 हजारापर्यंत आहे.

नक्की वाचा:शेतकऱ्यांच्या दाराशी ट्रॅक्टर सारखे उभे दिसतील ड्रोन, ड्रोन खरेदीसाठी आता वैयक्तिक शेतकऱ्यांना मिळणार 5 लाख अनुदान

2- महिंद्रा जीवो 245 DI- हे ट्रॅक्टर सर्व प्रकारची शेतीविषयक कामे सहजतेने करण्यास सक्षम असून यामध्ये 86 NM च्या पिक टॉर्कसह अतुलनीय शक्ती आहे. याची मजबुत मेटल बॉडी खडबडीत भूप्रदेशात वापरण्यासाठी उत्कृष्ट कार्य प्रदर्शन देते.

त्यासोबतच त्याची उच्च वाहून नेण्याची क्षमता 750 किलो आहे. मध्ये चांगले कर्षण आणि विविध अवजारे चांगली खेचण्याची क्षमता यासाठी 4 व्हील ड्राईव्ह आहेत.

तसेच ते त्याच्या वर्गातील मायलेज आणि कमी देखभालीसाठी सर्वोत्कृष्ट म्हणून ओळखले जाते. या ट्रॅक्‍टरची किंमत तीन लाख 90 हजार ते चार लाख पाच हजार पर्यंत आहे.

नक्की वाचा:गहू आणि इतर पिके कापण्यासाठी वापरा ही स्वस्त कृषी यंत्रे, कमी गुंतवणूकीतून मिळेल जास्त नफा

3- स्वराज्य 717- स्वराज्य 717 आहे मिनी ट्रॅक्टर चे उत्तम मॉडेल आहे जे विश्वसनीय तसेच वापरण्यास सोपे आहे. स्वराज्य 717 मिनी ट्रॅक्टर 15 एचपी 2300 rpm सह येते. ड्राय डिस्क ब्रेक हे या ट्रॅक्‍टरची उत्तम वैशिष्ट आहे.

त्याची हायड्रोलिक  क्षमता 780 किलो आणि व्हील ड्राईव्ह 2WD आहे. या स्वराज्य कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर मध्ये सहा फॉरवर्ड + रिव्हर्स गिअर बॉक्स च्या स्वरुपात गिअर शिफ्ट ऑपरेट करणे सोपे असून या ट्रॅक्‍टरची किंमत मिनी ट्रॅक्टर श्रेणीतील सर्वात किफायतशीर आहे.

त्याची किंमत दोन लाख 60 हजार ते दोन लाख 85 हजार पर्यंत आहे.

नक्की वाचा:'हे' 6 सीड ड्रील मशीन करतील शेतकऱ्यांचे पेरणीचे काम सोपे, जाणून घ्या त्यांची किंमत आणि वैशिष्ट्ये

English Summary: this three mini tractors is so useful in farming save time and money
Published on: 24 June 2022, 06:27 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)