भारत हा कृषीप्रधान देश असून भारतीय शेती आता परंपरागत राहिली नसून तिला आता आधुनिकीकरणाची व नवनवीन तंत्रज्ञानाची किनार लाभत आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी आता भरघोस उत्पन्न मिळवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
तसेच नवनवीन पिकांचे नाविन्यपूर्ण लागवड व उत्पादनासाठी शेतकरी सतत प्रयत्नशील असून त्यांना नवनवीन प्रकारच्या तंत्रज्ञानाची मदत देखील होत आहे. या लेखामध्ये असेच आपण पाच प्रकारच्या अत्याधुनिक अशा तंत्रज्ञानाची माहिती करून घेणार आहोत. जे तंत्रज्ञान क्षेत्रासाठी खूप फायद्याचे आहे.
नक्की वाचा:Machinary: दगड गोट्यांची अडचण आहे शेती करण्यात, तर 'स्टोन पिकर'येईल तुमच्या मदतीला
शेतकऱ्यांसाठी फायद्याचे तंत्रज्ञान
1- जीआयएस सॉफ्टवेअर आणि जीपीएस शेती- शेतीतील अचुकतेसाठी हे सॉफ्टवेअर फार महत्त्वाचे असूनजे लोक पर्जन्यमान,तापमान वनस्पतींच्या आरोग्याविषयी माहिती जाणून घेतात त्यांच्यासाठी हे फायदेशीर आहे.
2- सॅटॅलाइट इमेजरी- या उपग्रहाने ड्रोनद्वारे फोटो किंवा मौल्यवान डेटा संग्रहित केला जातो.हा डेटा वनस्पती,मातीची स्थिती,हवामान विषयक अचूक अंदाज या माध्यमातून घेता येतो. या तंत्रज्ञानाद्वारे पिकाच्या उत्पन्नाचा अंदाज सहजपणे घेता येतो.
पिकाशी निगडित विविध प्रकारचे धोक्याचे कारणे शोधण्याचे उद्दिष्ट ठेवून रियल टाइम शेतात देखरेख देखील करता येते. तसेच शेतातील पिकावर या उपग्रहाच्या साह्याने नजर ठेवता येते. पिकांवर येणाऱ्या पुढील धोक्याविषयी आपल्याला माहिती मिळते व कोणत्या प्रकारचे रोग आले आहेत हेदेखील कळते.
3- ड्रोन/ एरियल इमेजरी-यामध्ये ड्रोनच्या सहाय्याने शेतांचे फोटो घेतले जातात.पिकाची उंची तसेच पिकाचे बायोमास इत्यादी विषयी शेतकऱ्यांना अंदाज मिळत राहतो. ड्रोनच्या माध्यमातून घेण्यात आलेले फोटो हे उपग्रहाने घेतलेले फोटोपेक्षा फायदेशीर असतात
तसेच ड्रोनच्या माध्यमातून मिळालेली माहिती खूप महत्त्वपूर्ण असते. शिवाय अळ्यांचा व कीटकांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर ड्रोनच्या मदतीने फवारणी केली जाते. त्यामुळे रासायनिक नियंत्रण पद्धती लागू होण्याची शक्यता कमी होते व पिकाच्या वाढीवर व उत्पादनावर सकारात्मक परिणाम होतो.
4-मार्जिन डेटाबेस- पिकांच्या देखरेखीसाठी वापरली जाते. आपली शेती कोणत्या पद्धतीचे आहे याची माहिती घेण्यासाठी या पद्धतीचा उपयोग होतो.
एवढेच नाही तर आपण राहत असलेल्या जिल्ह्यातील इतर शेतांच्या तुलनेत आपले शेत कसे आहे याची माहितीसाठी देखील हे तंत्रज्ञान उपयोगाचे आहे. हवामान संदर्भात माहिती साठी देखील याचा उपयोग होतो.
5- शेती सॉफ्टवेअर आणि ऑनलाइन डाटा- हे शेतीवर आधारित सॉफ्टवेअर असून यामुळे उपग्रह प्रतिमाच्या माध्यमातून प्राप्त पिकांची स्थिती व हवामानाचा डेटाचे विश्लेषण केले जाऊ शकते. या माध्यमातून शेतकरी पिकांना अचूकपणे सिंचन लागू करू शकतात व दव तसेच उष्णतेपासून होणारे नुकसान थांबवता येऊ शकते.
नक्की वाचा:Technology: पिकांना हवा तेवढाच होतो ऑटोमॅटिक पाण्याचा पुरवठा, 'हे'तंत्रज्ञान आहे फायदेशीर
Published on: 02 October 2022, 03:00 IST