Farm Mechanization

शेतीमध्ये शेतकरी विविध कामांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रांचा वापर करू लागले आहेत. अगदी शेताची पूर्वमशागत असो की पिकांची लागवड आणि काढणी इत्यादी कामांसाठी शेतकरी आता यंत्राची मदत घेऊ लागले आहेत. यंत्राच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचतात आणि काम जलद गतीने होते व उत्पादनात देखील वाढ होते. या लेखामध्ये आपण अशाच उपयुक्त ट्रॅक्टरचलीत फुले बहुपीक टोकण यंत्रची माहिती घेणार आहोत.

Updated on 09 September, 2022 10:55 AM IST

शेतीमध्ये शेतकरी विविध कामांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रांचा वापर करू लागले आहेत. अगदी शेताची पूर्वमशागत असो की पिकांची लागवड आणि काढणी इत्यादी कामांसाठी शेतकरी आता यंत्राची मदत घेऊ लागले आहेत. यंत्राच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचतात आणि काम जलद गतीने होते व उत्पादनात देखील वाढ होते. या लेखामध्ये आपण अशाच उपयुक्त ट्रॅक्टरचलीत फुले बहुपीक टोकण यंत्रची माहिती घेणार आहोत.

नक्की वाचा:देशातील प्रथम शेती अवजाराचे ग्रीन सिस्टिम शोरूम बार्शीत सुरू, शेतकऱ्यांना होणार फायदा

 ट्रॅक्टरचलित फुले बहुपीक टोकण यंत्राचे फायदे

 शेतकरी बंधू जेव्हा शेतीमध्ये ट्रॅक्‍टरचा वापर करतात तेव्हा ते बारा ते पंचवीस अश्‍वशक्तीचा ट्रॅक्‍टर वापरतात. याच्या साहाय्याने उस तसेच फळबागांमध्ये आंतरमशागतीची तसेच पेरणीची कामे केली जातात. या सगळ्या कामांमध्ये सुसंगतता यावी यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले बहुपीक टोकण यंत्र विकसित केले आहे.

 या यंत्राचे वैशिष्ट्य

1-या यंत्राचा वापर करायचा असेल तर यासाठी बारा अश्वशक्ती आणि त्यापेक्षा अधिक क्षमतेचे ट्रॅक्टर उपयोगी ठरते.

नक्की वाचा:Agri Related:' 'महा-उस नोंदणी ॲप' आणि शेतकऱ्यांना होणारे फायदे,वाचा सविस्तर

2-या यंत्राचा वापर केल्यामुळे लागणारी मजुरी,वेळ आणि कष्ट यामध्ये खूप बचत होते.

3-सूर्यफूल,गहू,ज्वारी, सोयाबीन, हरभरा, मका, भुईमूग इत्यादी पिकांची टोकण करण्यासाठी हे यंत्र उपयुक्‍त ठरते.

4- एवढेच नाही तर दाणेदार खतांची व्यवस्थित पेरणी करता येण्यासाठी देखील याचा उपयोग होतो.

5- पारंपारिक पद्धती मध्ये होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत 40 ते 50 टक्के बचत होते.

6- पारंपरिक पद्धतीपेक्षा वेळेमध्ये 50 ते 60 टक्के बचत होते.

 इतर महत्त्वाचे फायदे

 आपण जेव्हा पिकांची पेरणी किंवा लागवड करतो तेव्हा बऱ्याचदा एकरी रोपांची संख्या योग्य प्रमाणात ठेवताना चूक होते. कधी कधी दाट लागवड होते व याचा विपरीत परिणाम हा रोपांवर होतो व दाटीमुळे पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही.

त्यामुळे रोपांची विरळणी करण्याचे काम करावे लागते तसेच रोपांचे चुकीच्या अंतरामुळे खते व पाण्याचे नियोजन देखील चुकते. परंतु लागवडीसाठी जर आपण अशा यंत्रांचा वापर केला तर निविष्ठांचा योग्य प्रमाणात आणि आवश्यक असा वापर करता येतो.

रोपांचे व पेरणीचे अंतर योग्य प्रमाणात ठेवता आल्याने खत आणि पाणी व्यवस्थापन खूप चांगल्या पद्धतीने होते व एवढेच नाही तर हेक्टरी एकूण रोपांची संख्या देखील प्रमाणशीर पद्धतीत ठेवता येते.

नक्की वाचा:अरे वा, भारीच की! शेतकऱ्यांचे वाचणार पैसे, देशात लवकरच लाँन्च होणार इलेक्ट्रिक ट्रॅक्टर

English Summary: phule bahupik tokan yantra oprated by tractor is benificial for crop harvesting
Published on: 09 September 2022, 10:55 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)