Farm Mechanization

भारत सरकार काही दिवसात सीएनजी ट्रॅक्टर लॉन्च करणार आहे. याविषयीची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. या ईलेक्ट्रिक ट्रॅक्टरमुळे इंधनावरील खर्च - व्याप कमी होईल. दरम्यान या ट्रॅक्टरच्या वैशिष्ट्यांविषयी पुर्ण माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. पण या ट्रॅक्टरमध्ये बॅटरीचा वापर केला जाईल ते पुर्णपणे ईलेक्ट्रिक असणार आहे.

Updated on 12 April, 2021 2:05 PM IST

भारत सरकार काही दिवसात सीएनजी  ट्रॅक्टर लॉन्च करणार आहे. याविषयीची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. या ईलेक्ट्रिक ट्रॅक्टरमुळे इंधनावरील खर्च - व्याप कमी होईल. दरम्यान या ट्रॅक्टरच्या वैशिष्ट्यांविषयी पुर्ण माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. पण या ट्रॅक्टरमध्ये बॅटरीचा वापर केला जाईल ते पुर्णपणे ईलेक्ट्रिक असणार आहे.

दरम्यान सोनालिका कंपनीने आधीच ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च केला आहे. या कंपनीने ट्रॅक्टरला ‘Tiger Electric’ या नावाने  मागील वर्षाच्या डिसेंबरमध्ये लॉन्च केला होता. युरोपमध्ये डिझाईन केले गेले होते, आणि याची निर्मिती भारतात करण्यात आली होती.

हेही वाचा: ‘’फार्मामित्र – आपली काळजी करणारं ऍप’’ कृषी आणि विम्याची गरजेसाठी मदत करणारा शेतकऱ्यांचा खरा मित्र

सोनालिका Tiger ची वैशिष्ट्ये

सोनालिका टायगर ईलेक्ट्रिक कंपनीने IP67  मानकच्या 25.5 kW ची क्षमतेचं नैसर्गिक कूलिंग कॉम्पॅक्ट बॅटरीचा केला आहे. या ट्रॅक्टरचं सर्वात मोठं वैशिष्ट्ये आहे ते म्हणजे डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत एक चतुर्थांशपेक्षाही कमी खर्च लागत असतो. कंपनीनुसार, या ट्रॅक्टरला घरगुती सॉकेटनेही चार्ज केलं जाऊ शकते आणि फक्त १० तासात पूर्णपणे चार्ज होतं असते.दरम्यान यात वापरण्यात आलेलं जर्मन ईलेक्ट्रिक मोटरमुळे आपल्याला शंभर टक्के टॉर्क मिळत असते.

 

दरम्यान कंपनी फास्ट चार्जिंह सिस्टमपण देते. ज्याच्या साहाय्याने ट्रॅक्टरच्या बॅटरीला फक्त ४ तासात पुर्ण चार्ज करता येते. हा ट्रॅक्टर २ टन  ट्रॉलीसह काम करताना २४.९ किमी प्रति तास टॉप स्पीड आणि ८ तास बॅटरी बॅकअप देते. सोनालिका ट्रांसमिशन असल्याने हे ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे, कारण यातून हीट निघत नाही.

हेही वाचा: शेतीतील यांत्रिकीकरण वाढण्यास उपयुक्त आहे केंद्र सरकारची योजना

काय आहे  Sonalika Tiger ची किंमत

कंपनी  या ईलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा निर्माण आपल्या पंजाबच्या होशियारपूर स्थित प्लांटमध्ये केलं जातं आहे. याची सुरुवातीची किंमत ५.९९ लाख रुपये आहे. कंपनीच्या वेबसाईट सोनालिका डॉटकॉमवर जाऊन याच्याविषयीच माहिती मिळवू शकतात. यासह तुम्ही आपलं ट्रॅक्टर बुकही करु शकतात.

English Summary: Once charged, the electric tractor will work for 8 hours
Published on: 24 February 2021, 01:46 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)