Farm Mechanization

शेतीत काम करणाऱ्या मजुरांची टंचाई जाणवत आहे. शेतमजुरीचे दरही वाढले आहेत. त्यामुळे शेतीचे यांत्रिकीकरण झपाट्याने होतेय. यांत्रिकीकरणामुळे कमी कष्टात, कमी वेळेत शेतीची कामे होतात. निविष्ठांचा कार्यक्षम वापर होऊन शेतीमालाची गुणवत्ता आणि उत्पादकता वाढीसही हातभार लागतो. शेतीत ट्रॅक्टरची संख्या वाढली म्हणजे यांत्रिकीकरण वाढले आहे.

Updated on 28 February, 2023 11:06 AM IST

शेतीत काम करणाऱ्या मजुरांची टंचाई जाणवत आहे. शेतमजुरीचे दरही वाढले आहेत. त्यामुळे शेतीचे यांत्रिकीकरण झपाट्याने होतेय. यांत्रिकीकरणामुळे कमी कष्टात, कमी वेळेत शेतीची कामे होतात. निविष्ठांचा कार्यक्षम वापर होऊन शेतीमालाची गुणवत्ता आणि उत्पादकता वाढीसही हातभार लागतो. शेतीत ट्रॅक्टरची संख्या वाढली म्हणजे यांत्रिकीकरण वाढले आहे

परंतु आपला देश ट्रॅक्टरचलित, बिगर ट्रॅक्टरचलित अवजारांच्या वापरात मात्र पिछाडीवर आहे. भारतीय शेतीत उपयुक्त ठरणारी छोटी यंत्रे अवजारे उपलब्ध होत नाहीत, असा एनसीएईआरचा (राष्ट्रीय उपयोगिता आर्थिक संशोधन परिषद) अहवाल सांगतो.

त्यामुळे देशात ट्रॅक्टरचा कार्यक्षम वापरही होताना दिसत नाही. अशावेळी देशात कृषी यंत्रे अवजारे क्षेत्रात संशोधन व विकासाची गरजही या अहवालात नमूद केली आहे. देशातील यांत्रिकीकरणाबाबत अजून एक धक्कादायक बाब म्हणजे आपल्या वाढत्या यांत्रिकीकरणावर चीनमधील यंत्र अवजारे निर्माते पोसले जात आहेत. चीनमधील यंत्रे अवजारे उद्योग वाढला ते आपल्या गरजेनुसार देशात येत असतील तर त्याला हरकत असण्याचे कारण नाही.

परंतु चीनमधील यंत्रे अवजारांच्या वाढत्या आयातीने भारतीय उद्योगाचे खच्चीकरण होत असल्यास ही बाब गंभीर आहे. अशावेळी भारत सरकारने ही वाढती आयात रोखण्याऐवजी त्यास अनुदानाच्या कक्षेत आणले आहे. ही आपल्याच स्पर्धक विदेशी निर्यातदार देशाला स्वदेशी करातून पोसण्याची चूक केंद्र सरकार करीत असल्याची संतप्त प्रतिक्रियाही भारतीय यंत्रे अवजारे उद्योगातून व्यक्त होत आहे.

आपल्या देशात जिरायती शेतीचे प्रमाण जास्त आहे. शेती छोट्या छोट्या तुकड्यांत विभागलेली आहे. दुर्गम डोंगराळ भागातील शेती क्षेत्रही २० टक्केच्या वर आहे. आपल्याकडे वैविध्यपूर्ण पीक पद्धती आहे. अशा शेतीत बाहेरून आयात केलेली यंत्रे अवजारे जशीच्या तशी उपयुक्त ठरताना दिसत नाहीत.

अशावेळी देशात यंत्रे अवजारे संशोधन आणि त्यांच्या व्यापारीकरणास पूरक धोरणाचा अवलंब होणे गरजेचे आहे. परंतु आपण अजूनही बाहेरची यंत्रे अवजारे आयातीवरच भर देत आहोत. आत्मनिर्भरतेच्या हा उलटा प्रवास असून तो यांत्रिकीकरणाबरोबर इतर अनेक बाबतीतही दिसून येतो, देशाला यांत्रिकीकरणात स्वयंपूर्ण व्हायचे असेल तर याबाबत संशोधन वाढवावे लागेल.

यांत्रिकीकरणासाठीच्या संशोधनाला पायाभूत तसेच अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. यासाठी मोठ्या निधीची तरतूद करावी लागेल. देशात यंत्रे अवजारे यांच्याबाबत झालेल्या संशोधनाचे व्यापारीकरण करण्यासाठी यंत्रे अवजारे विकसित करणाऱ्या उद्योजकांना पूरक धोरणाचा अवलंब करावा लागेल.

रस्त्यावर मासेच मासे! वादळानंतर वातावरण बदललं, पडला चक्क माशांचा पाऊस, रस्त्यांवर माशांचा खच

यामध्ये उद्योजकांना संशोधनात सहभागी करून घेण्याबरोबरच स्वतंत्रपणे यंत्रे अवजारे विकसित करण्यासाठी खासगी उद्योजकांनाही बळ मिळायला हवे. विविध करांमध्ये सवलत देऊन केंद्र सरकार देशातील उद्योजकांना प्रोत्साहन देऊ शकते.

देशात विकसित यंत्रे अवजारे उत्तम गुणवत्तेची असायला हवीत यंत्रे व अवजारांची गुणवत्ता नियंत्रणासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करायला हवी. देशात विकसित यंत्रे-अवजारे सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील हेही पाहावे लागेल. सध्या यंत्रे अवजारे खरेदीसाठी अनुदान आहे, राज्यात अनुदानाचा लाभासाठी महाडीबीटी यंत्रणा आहे.

महत्वाच्या बातम्या;
सांगलीतील बाहुबली कांदा ठरतोय चर्चेचा विषय! एकाच कांद्याचे वजन तब्बल पाऊण किलो...
शेतकऱ्यांना आज मिळणार पीएम किसान योजनेतील १३ वा हप्ता
अँपल बोर लागवडीपासून कोट्यवधी कमाई, अनेक शेतकरी झाले मालामाल..

English Summary: Mechanization of farmers is essential
Published on: 28 February 2023, 11:06 IST