Farm Mechanization

राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सुमारे २० टक्के इतका वाटा असलेल्या भारतासारख्या देशामध्ये ४० % रोजगारही त्यातून उपलब्ध होतो. इतकी लोकसंख्या असतानाही यांत्रिकीकरणाची आवश्यकताच का आहे, असा सवाल अनेकांना भेडसावतो. भारतातील एकूण लागवडीखालील जमिनीपैकी ५१% कोरडवाहू, तर ४९% बागायती आहे. उत्पन्नामध्येही बागायती क्षेत्राचा वाटा ६०% असून, कोरडवाहू जमिनीतून फक्त ४०% उत्पन्न हाती येते.

Updated on 19 January, 2023 10:39 AM IST

राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सुमारे २० टक्के इतका वाटा असलेल्या भारतासारख्या देशामध्ये ४० % रोजगारही त्यातून उपलब्ध होतो. इतकी लोकसंख्या असतानाही यांत्रिकीकरणाची आवश्यकताच का आहे, असा सवाल अनेकांना भेडसावतो. भारतातील एकूण लागवडीखालील जमिनीपैकी ५१% कोरडवाहू, तर ४९% बागायती आहे. उत्पन्नामध्येही बागायती क्षेत्राचा वाटा ६०% असून, कोरडवाहू जमिनीतून फक्त ४०% उत्पन्न हाती येते.

वाढत्या लोकसंख्येचा विचार केल्यास २०३० मध्ये ३५५ दशलक्ष टन एवढा अन्नधान्याची गरज असून, त्याच्या पूर्ततेसाठी ४० किलोवॉट प्रति हेक्टर इतक्या कृषिशक्तीचा वापर करावा लागेल. त्यासाठी विविध यंत्राचा वापर वाढवण्याची गरज आहे.

कृषी यांत्रिकीकरण म्हणजे काय?
शेतीतील कामे वेळेवर, कमी कष्टात, बियाणे, खते, रसायने इ. निविष्ठांचा योग्य व कार्यक्षम वापर करण्याच्या उद्देशाने अवजारे व यंत्राचा वापर म्हणजेच कृषी यांत्रिकीकरण होय, यामुळे उत्पादन खर्चात ३० ते ४० % बचत होते तर वेळच्या वेळी कामे झाल्यामुळे उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते.

फायदे
१) कृषी औजारामुळे शेतीतील कामे वेळेवर व योग्यरीत्या पार पडतात.
२) जमीन, पाणी, बियाणे, खते, रसायने, मनुष्यबळ यांचा कार्यक्षम वापर होतो. उदा. सुधारित पेरणी यंत्राने पेरणी केल्यास बियाणाचे प्रमाण योग्य ठेवतानाच दोन रोपांतील अंतर योग्य राहते. त्याचा फायदा वाढीमध्ये होतो.
३) उत्पादनात १५ ते ४०% एवढी वाढ होऊन खर्चात बचत होते. परिणामी निव्वळ नफ्यामध्ये वाढ होते.
४) मनुष्यबळ कमी लागते.

भाजीपाल्याच्या दरात व्यापाऱ्यांची मनमानी थांबवायची असेल तर पुरवठा प्रक्रिया साखळी करा सक्षम

५) कष्ट कमी होतात. उदा. ट्रॅक्टरचलित नांगरामुळे नांगरणीतील कष्ट कमी झाले आहेत. पारंपरिक नांगरणीमध्ये बैलापाठोपाठ शेतकऱ्याला एक हेक्टरसाठी ३० सेंमी नांगरामागे ६६ किमी एवढे चालावे लागते.
६) प्रत्यक्ष शेती व कष्टाच्या कामातून सवलत मिळत असल्यामुळे चालक, कृषी औजारांची दुरुस्ती व चालवणे यात कुशल कामगारांना रोजगाराची उपलब्धता वाढते.

इतके फायदे असतानाही भारतीय शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचे प्रमाण कमी असण्याची काही कारणे
१) अल्पभूधारक शेतकऱ्यांचे अधिक प्रमाण, योग्य आकाराच्या यंत्राचा अभाव. (तक्ता १)
२) शेतकऱ्याची कमी क्रयशक्ती.
३) तांत्रिक माहितीचा अभाव.
४) निगा व दुरुस्तीच्या सोयीचा अभाव.

शेतीच्या विविध कामांचे यांत्रिकीकरण हा तसा वादाचा मुद्दा राहिलेला आहे. सुरुवातीला यांत्रिकीकरणामुळे शेतीतील मजुरांची गरज कमी होईल. त्यांच्यामध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढून त्यांचे विस्थापन होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र शेती कामातील मजुरांचे कष्ट वाचण्यासाठीही यांत्रिकीकरण महत्त्वाचे ठरत आहे. शेतीचे यांत्रिकीकरण हे केवळ ट्रॅक्टरच्या वापराची जोडले जाते. मात्र या संज्ञेची व्याप्ती त्यापेक्षाही मोठी आहे.

शेतीतील विविध कामांच्या उपलब्धतेसाठी मनुष्यचलित, पशुधनचलित, ट्रॅक्टरचलित अवजारांसोबतच स्वयंचलित अशा अनेक श्रेणी उपलब्ध होत आहेत. कृषी यांत्रिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये अशा सर्व यांत्रिकी साधनांचा विकास, वापर आणि व्यवस्थापन यांचा समावेश होतो. त्यामध्ये वापरकर्त्याच्या गरजेवर आधारित यंत्राची निर्मितीला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे.

ऊस उत्पादकांची वास्तवता, शेतकऱ्यांनो हा लेख तुमच्यासाठी..

भारत पर्यायाने महाराष्ट्रातील कृषी यांत्रिकीकरणाची वाटचालीमध्ये सुधारित औजारांचा वापर आणि अधिक कृषिशक्तीचा पुरवठा या दुहेरी नितीवर भर दिला जातो. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळ, पशुबल आणि यांत्रिक शक्ती यांचे व्यावहारिक मिश्रण याला प्राधान्य दिले जाते या उलट पाश्चात्त्य देशांमध्ये कृषी यांत्रिकीकरणाचा मूळ हेतू हा शेतीतून मनुष्यबळ कमी करून औद्योगिक क्षेत्रात गुंतविणे हा होता.

योग्य दिशेने सुरू असलेल्या यांत्रिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे कृषी उत्पादन वाढीबरोबरच उत्पादन खर्च कमी करणे, पिकांचे नुकसान कमी होणे या गोष्टी शक्य झाल्या. तसेच कृषी यांत्रिकीकरणामुळे बेरोजगारी वाढण्याची शक्यता पंजाब, हरियाना अशा राज्याच्या उदाहरणावरून व्यर्थ ठरल्याचे स्पष्ट होत आहे, उलट यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांची मिळकत आणि ग्रामीण रोजगारात वाढ दिसून आली.

महत्वाच्या बातम्या;
नोकरीला रामराम करत स्ट्रॉबेरीची लागवड! प्रयोगशील शेतकऱ्याची यशोगाथा
बारामतीमध्ये आजपासून कृषी प्रदर्शनास सुरुवात, कृषिमंत्र्यांसह अजित पवार राहणार उपस्थित
मातीची जैविक क्षमता टिकवणे आज महत्त्वाचे

English Summary: Farmers, agricultural mechanization is the need of the hour
Published on: 19 January 2023, 10:39 IST