जगातील टॅफे (Tafe) ही तिसरी सगळ्यात मोठी ट्रॅक्टर्स (Tractor) निर्माता कंपनी आहे. भारतातील युवा शेतकऱ्यांना लक्षात घेऊन टॅफे ट्रॅक्टर्स आणि फार्म इक्विपमेंट लिमिटेड समूहाने आयशर प्राइमा G3 सीरीज लाँच केली आहे. यामध्ये जागतिक दर्जाचे डिझाइन करण्यात आले आहे.
ट्रॅक्टर्सची वैशिष्ट्ये
१. आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेली आयशर प्राइमा G3 रेंज मध्ये हाय टॉर्क - फ्यूएल सेवर (एच.टी.-एफ.एस.) लिक्विड कूल्ड इंजन आहे.
२. जे उत्तम परफॉर्मन्स आणि इंधनाची जास्त बचत प्रदान करते. यामधील कॉम्बीटॉर्क ट्रांसमिशन अधिक शक्ती, टॉर्क तयार करते.
३. नवीन मल्टीस्पीड पी.टी.ओ. ४ विविध पी.टी.ओ. मोडची विशिष्ट सुविधा देतात. विविध कामासांठी उपयुक्त.
४. आयशर प्राइमा G3 ला अत्याधुनिक सुरक्षितता लक्षात घेऊन डिझाइन केले आहे.
५. सर्वोत्तम आरामासाठी उच्च आसन, मोठे आणि आरामदायक प्लॅटफॉर्म आणि वन-टच फॉरवर्ड ओपनिंग बोनेट
६. दिवस असो वा रात्र यामधील अद्वितीय 'लीड मी होम' फीचर सुरक्षा आणि सुविधा हे दोन्ही सुनिश्चित करते.
७. प्राइमा G3 मध्ये आरामदायक, सुरक्षित आहे.
८. आयशर प्राइमा G3 आयशरच्या मुख्य मानक टिकाऊपणा आणि विश्वसनीयतेचे प्रतिबिंब आहे.
https://tractornews.in/articles/newly-launched-eicher-prima-g3-series-tractors/
टॅफेचे सी.ई.ओ. संदीप सिन्हा म्हणाले, ''आम्हाला जागतिक दर्जाची स्टाइलिंग आणि अंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली G3 सीरीज़ लाँच करताना खूप आनंद होत आहे. जी स्टाइलिंग, उत्तम फिट आणि मजबूत निर्माण क्वॉलिटीमध्ये उच्च दर्जाची ऑटोमोटिव्ह स्तराची उत्कृष्टता प्रदान करते.
आयशर प्राइमा G3, आयशरच्या मुख्य मानक टिकाऊपणा आणि विश्वसनीयतेचे प्रतिबिंब आहेत. नवीन आयशर प्राइमा G3 सीरीज़ आमच्या ग्राहकांना सहज उपलब्ध होईल याची आम्ही खात्री करू.”
गाडी घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; भारतीय Tata Nexon कार आता CNG मध्ये उपलब्ध, जाणून घ्या किंमत
पावसासंबंधी निसर्गाचे संकेत कसे ओळखायचे? या विषयी पंजाबराव डख यांनी सांगितली महत्त्वाची माहिती...
भारतीय ट्रॅक्टर उद्योगामध्ये आयशर ट्रॅक्टर्सने अनेक पिढ्या भारतीय कृषी समुदायाला साह्य करण्यामध्ये प्रमुख भूमिका बजावली आहे. ६० वर्षांहून अधिक काळाच्या वारसासह त्यांनी हरित क्रांतीमध्ये महत्त्वात्वाची भूमिका बजावली आहे, तसेच अद्वितीय विश्वास संपादित केला, या लाँचसोबत आयशर ट्रॅक्टर्सने पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांना "उम्मीद से ज्यादा" या वचनाचे पालन केले आहे.
10 रुपयांची नोट 2 लाख रुपयांना विकते; जाणून घ्या विकण्याची सोपी पद्धत
Published on: 10 May 2022, 12:08 IST