Farm Mechanization

सध्या ऊस उत्पादक शेतकरी हे आधुनिक पद्धतीने उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर काढत आहेत. यामुळे आता येणाऱ्या काळात महाराष्ट्रात सुमारे ५०-७५ टक्के क्षेत्रातील उसाची तोडणी यंत्राद्वारे होण्याची शक्यता आहे.

Updated on 25 July, 2023 1:00 PM IST

सध्या ऊस उत्पादक शेतकरी हे आधुनिक पद्धतीने उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर काढत आहेत. यामुळे आता येणाऱ्या काळात महाराष्ट्रात सुमारे ५०-७५ टक्के क्षेत्रातील उसाची तोडणी यंत्राद्वारे होण्याची शक्यता आहे.

यासाठी ऊस तोडणी यंत्र विकसित करणाऱ्या कंपन्यांनी योग्य धोरण आखून ते अमलात आणणे आवश्यक झाले आहे. यामध्ये समस्यांचा आढावा घेऊन त्यांच्या निवारणासाठी रूपरेषा ठरविण्याकरिता डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशनतर्फे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

यामध्ये ऊसयंत्र निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या चर्चेमध्ये नवीन ऊस जातींचा प्रसार, ऊस तोडणी यंत्रातील सुधारणांबाबत सविस्तर चर्चा झाली. महाराष्ट्रामध्ये ऊस लागवड क्षेत्र वाढत आहे.

साखर कारखान्यांनी गाळप क्षमता वाढविली आहे. गेल्या काही हंगामात ऊस तोडणी मजुरांची उपलब्धता आणि समस्या तसेच मजुरांच्या टोळ्यांकडून होणारे गैरप्रकारही वाढले. वेळेवर ऊस तोडणी आणि गाळप करणे कठीण झाल्याने साहजिकच यंत्राद्वारे ऊस तोडणीचे प्रमाण वाढत आहे.

खतांच्या किमतीवरून विधानसभेत राडा

यंत्रामुळे मोठ्या क्षेत्रातील उसाची जलद तोडणी केली जाते. यामुळे मजुरांची फारशी गरज भासत नाही. जमिनीलगत ऊस तोडल्यामुळे बुडाजवळ जास्त शर्करा असलेली सर्व पेरे गाळपासाठी जातात.

त्यामुळे साखरेची रिकव्हरी वाढते. ऊस तोडणी करताना मजूर बुडापासून दहा ते बारा इंचावर कोयता चालवितात. त्यामुळे खालची चांगली पेरे शेतातच राहून नुकसान होते. यंत्राद्वारे सर्व उसाची जमिनीलगत एकसारखी तोडणी होत असल्याने फुटव्यांचे डोळे एकसारखे उगवतात. खोडवा पीक चांगले जोमदार वाढते.

शेतकऱ्यांचे क्षेत्र लहान असल्यामुळे प्रचलित ऊस तोडणी यंत्र चालविणे आणि शेतामध्ये वारंवार वळविणे जिकिरीचे होते. यंत्राचा डिझेल खर्च वाढून यंत्राद्वारे तोडणी करणे मजुरांकरवी तोडणी करण्यापेक्षा महाग ठरत आहे.

हळद 15 हजार पार, आवक झाली कमी..

अवजड यंत्राद्वारे ठिबक सिंचनाच्या नळ्या तुटतात, जमीनही कठीण होते, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. सरी खोल करून मोठी बांधणी केली तर ऊस लोळण्याचे प्रमाण कमी होते. तसेच तोडणी करताना ठिबकच्या नळ्या खोल सरीत टाकल्या तर नळ्यांचे नुकसान होत नाही असा काही शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

यंत्र चालविण्यासाठी उसाच्या दोन सरींमधील लागवडीचे अंतर कमीत कमी साडेचार ते पाच फूट ठेवावे लागते. सध्या सर्वसाधारणपणे शेतकरी तीन फुटांचे अंतर ठेवतात. जास्त अंतर ठेवल्यास उसाचे उत्पादन कमी होईल अशी काही शेतकऱ्यांना भीती वाटते, अशा अडचणी देखील आहेत.

भात लागवड तंत्रज्ञान
राज्यभर पावसाचा जोर वाढतच राहणार, हवामान खात्याने सांगितलं कारण...
पावसाळ्यात लम्पी पुन्हा वाढला! कोल्हापूरमध्ये अनेक गाईंमध्ये झाला प्रसार...

English Summary: Challenges in sugarcane harvester use
Published on: 25 July 2023, 01:00 IST