Farm Mechanization

शेतकरी (farmers) शेतीमधून चांगले उत्पादन घेत असतात. खर्चाचा आणि उत्पादनाचा समतोल राखत योग्य नियोजन चालू असते. परंतु सध्या आपण पाहिले तर शेतीमधील अधिक खर्चामुळे शेतकरी सध्या मातीविना शेतीकडे (Agriculture without soil) वळत आहेत.

Updated on 23 August, 2022 12:30 PM IST

शेतकरी (farmers) शेतीमधून चांगले उत्पादन घेत असतात. खर्चाचा आणि उत्पादनाचा समतोल राखत योग्य नियोजन चालू असते. परंतु सध्या आपण पाहिले तर शेतीमधील अधिक खर्चामुळे शेतकरी सध्या मातीविना शेतीकडे (Agriculture without soil) वळत आहेत.

मातीविना शेती म्हणजेच आपण हायड्रोपोनिक फार्मिंग (Hydroponic farming) शेतीबद्दल आपण बोलत आहोत. एका शेतकर्‍याने मातीशिवाय झाडे वाढवल्याचे करुन दाखवले आहे. या तंत्राने पाटणा येथील मोहम्मद जावेद नावाच्या शेतकऱ्याने (farmers) आपल्या बागेत मातीशिवाय झाडे लावली आहेत.

Weed Control: असे करा मका, सोयाबीन, कापूस, ज्वारी, पिकांमधील तणाचे नियंत्रण

ते अनेक वर्षांपासून मातीशिवाय झाडे लावत आहे आणि ते यशस्वीपणे वाढवत आहे. त्यांनी या पद्धतीने २५० हून अधिक झाडे लावली आहेत. या पद्धतीत पाण्यात विरघळलेल्या पोषक आणि खनिजांपासून वनस्पती विकसित होते.

जर तुमच्याकडे जमिनी कमी असेल तर विंडो गार्डन, रूम गार्डन, हँगिंग गार्डन, टेबल गार्डन, बाल्कनी गार्डन, बाटली गार्डन, वॉल गार्डन आणि ट्यूब गार्डन या पद्धतीने शेती करू शकतात.

दुभत्या जनावरांचे दूध वाढवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय; कमी खर्चात होईल जास्त नफा

कशी लागवड केली जाते?

या तंत्राने करण्यात येणाऱ्या शेतीसाठी एम. एक लिटर पाण्यात एक मिलिलिटर ब्यूफोर्ट एम (One milliliter of Beaufort m) मिसळून द्रावण तयार केले जाते. ते ३० ते ४० सें.मी. उंच झाडाला १ वर्षासाठी पोषण देते.

तसेच हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाला नवा आयाम देण्यासाठी जावेद यांनी खडे, वाळू, दगडाचे तुकडे इत्यादींपासून सेंद्रिय खत तयार केले आहे.

महत्वाच्या बातम्या 
काय सांगता! आता हवेतही घेता येणार बटाट्याचे उत्पादन; एरोपोनिक तंत्रज्ञानाची कमाल
Green Manure: पिकांना युरिया खताची गरज भासणार नाही; आता घरीच शेतात बनवा हिरवळीचे खत
Soybean Market Price: सोयाबीन बाजारभावात मोठा बदल; जाणून घ्या सोयाबीचे दर

English Summary: agriculture done without soil technique production
Published on: 23 August 2022, 12:24 IST