Education

श्रुती शर्मा या दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजची पदवीधर आहे. पदवीच्या वेळी ती इतिहास ओनर्स ची विद्यार्थिनी होती.त्यानंतर तिने जवाहरलाल नेहरू विद्यापीठात आधुनिक इतिहासात पदवीत्तर पदवी घेतली.

Updated on 02 June, 2022 9:46 PM IST

श्रुती शर्मा या दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजची पदवीधर आहे. पदवीच्या वेळी ती इतिहास ओनर्स ची विद्यार्थिनी होती.त्यानंतर तिने जवाहरलाल नेहरू विद्यापीठात आधुनिक इतिहासात पदवीत्तर पदवी घेतली.

ही माहिती देत असताना त्यांनी सांगितले की,मलाइतक्या चांगल्या निकालाची अपेक्षा नव्हती.उत्कृष्ट निकाल लागेल अशी आशा होती परंतु ऑल इंडिया रँक 1 प्राप्त करणे त्यांच्या अपेक्षेप्रमाणे नव्हते. यूपीएससी साठीतयारीचा एक प्रवास खूप अनोखा होता.

गेल्या चार वर्षापासून त्या या परीक्षेची तयारी करत होत्या. श्रुतीला नेहमीच आयएएस अधिकारी म्हणून काम करण्याची इच्छा होती. तथापि तिने मूलभूत गोष्टी पासून सुरुवात केली. एनसीईआरटी चा अभ्यास करून तिने यूपीएससी आयएएसची तयारी सुरू केली.

नक्की वाचा:Pan-Aadhar Linking: पॅनकार्ड आधारसोबत लिंक नाही केलं तर मोजावे लागतील इतके पैसे; पॅन आधार सोबत लिंक करण्याची प्रोसेस जाणुन घ्या

 नोट्स आणि वर्तमानपत्रांचा केला पुरेपूर वापर

 युपीएससीच्या तयारीसाठी ती फक्त वर्तमानपत्रे आणि स्वतःच्या नोट्सवर अवलंबून होत्या. तुम्हाला जे आवडते ते तुम्ही केले पाहिजे असे श्रुती शर्माने तयारी करताना सांगितले.

श्रुतीने तिला इतरांनी काय सल्ला दिला त्या कडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. त्याऐवजी तिने तिच्या स्वतःच्या कार्यपद्धती आणि धोरणे विकसित केली जी तिच्या ज्ञानात्मक क्षमतेनुसार तयार केली गेली.

श्रुती तिच्या पहिल्या यूपीएससी प्रयत्नात नापास झाली.या बाबतीत तिला विचारले असता ती म्हणाली,दुसऱ्यांदा हा प्रयत्न केला आहे. अध्यापनाच्या माध्यमात काही अडचणींमुळे मला माझी मुख्यपरीक्षा हिंदीतून द्यावी लागली.

मुलाखतीत एका गुणाने संधी हुकल्यावर तिला पुढच्या वेळी आणखी मेहनत करण्याची प्रेरणा मिळाली. तिने तिच्या चुकांमधून खूप काही सुधारणा करून त्यामधून बरेच शिकायला देखील मिळाले आणि तिच्या दुसऱ्या प्रयत्नात सुधारणा करत यूपीएससी सीएसई 2021 मध्ये ऑल इंडिया रँक 1 मिळवली.

नक्की वाचा:Benifits Of Ginger: कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी अद्रक आहे गुणकारी, जाणुन घ्या अद्रकचे आश्चर्यकारक फायदे

UPSC इच्छुकांना श्रुतीचा सल्ला

 श्रुती युपीएससी  सीएसई उमेदवारांना त्यांच्या या प्रवासादरम्यान धीर धरण्याचा सल्ला देते. श्रुती तिच्या शिक्षणाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करायला सांगते आणि उमेदवारांना ते अभ्यासासाठी किती तास घालवतात याची काळजी करू नका असा सल्ला देते.

एका वृत्तसंस्थेला सांगितले की तुम्ही किती तास अभ्यासात घालवता याला महत्त्व नाही तर तुम्ही किती चांगला अभ्यास करता याला महत्व आहे.अभ्यासाचे तास मोजणे हे अभ्यासा इतके महत्त्वाचे नाही.तर अभ्यासाची रणनीती महत्त्वाचे असल्याने विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना त्यांचे स्त्रोत मर्यादित ठेवावे. साहित्य, नोट्स,  वर्तमानपत्रे आणि सराव उत्तरे याशिवाय लेखनामुळे तिला खूप मदत झाली.

नक्की वाचा:शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी होणार ऐतिहासिक कांदा परिषद

English Summary: upsc toppers shruti shrma give some tips of study to student know that
Published on: 02 June 2022, 09:46 IST