सध्या महाराष्ट्र शासनाकडून विविध प्रकारच्या भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जात असून मोठ्या प्रमाणावर सर्वांनी या संधीचे सोने करावे अशी सध्या स्थिती आहे. सध्या पोलीस भरतीचे अर्ज प्रक्रिया सुरू आहेत त्यातच आता तलाठी भरती देखील राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वपूर्ण काळ असून या आलेल्या संधीचे सोने करण्याची खरच गरज आहे.
नक्की वाचा:विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात पदवी शिक्षण 4 वर्षांचे होणार
यामध्येच एक महत्त्वाचे अपडेट समोर आले असून आता ग्रामसेवक या पदासाठी ग्रामविकास विभागाअंतर्गत राज्यात दहा हजार पदांसाठी भरती करण्याबाबत सरकारने निर्णय घेतला असून याबाबतचा शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आला आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ही भरती झाल्यानंतर ग्रामपंचायतींचा कारभार गतिमान होण्यास देखील चालना मिळणार आहे.
यामध्ये राज्याच्या ग्रामविकास विभाग सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या 80% मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरले जाणार असून ही सदर मान्यता वित्त विभागाच्या निर्देशानुसार 15 ऑगस्ट 2023 पर्यंत लागू राहणार आहे. तसेच त्यापुढील भरती प्रक्रिया वित्त विभागाचा शासन निर्णय दि. 30 सप्टेंबर 2022 नुसार सुधारित आकृतीबंध शासनाने मांडणी केल्यावरच करता येणार आहे.
या भरती संबंधीचे जिल्हा निवड मंडळामार्फत असलेले परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक
1- या भरतीची जाहिरात प्रसिद्ध तारीख- या भरतीची जाहिरात संभाव्य वेळापत्रकानुसार एक ते सात फेब्रुवारी 2023 पर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहे.
2- यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख- ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा असेल असे उमेदवार 22 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करू शकतात. तसेच 23 फेब्रुवारी ते 1 मार्च 2023 दरम्यान प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केली जाईल. यामध्ये पात्र उमेदवारांची यादी ही 2 ते 5 मार्च 2023 पर्यंत जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर जे पात्र उमेदवार असतील त्यांना हॉल तिकीट 6 ते 13 एप्रिल 2023 दरम्यान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
3- या तारखेला राहील परीक्षा- 14 ते 30 एप्रिल 2023 या कालावधीमध्ये ऑनलाइन किंवा ऑफलाइन माध्यमातून परीक्षेचे आयोजन करण्यात येईल.
4- यामधील अंतिम निकाल आणि पात्र उमेदवारांना जॉइनिंग लेटर म्हणजेच नियुक्तीचे आदेश हे 1मे ते 31 मे 2023 पर्यंत दिले जाणार आहेत.
Published on: 13 December 2022, 04:14 IST