शिक्षण घेणे सध्या सगळ्यांच्याच आवाक्यात राहिलेले नाही.आपल्याला माहित आहेच की,वेगवेगळे कोर्सेस, तसेच उच्च शिक्षणासाठी खूप मोठ्या पैशाची गरज भासते.
तेवढा पैसा खर्च करणे प्रत्येकाला शक्य नसते. प्रत्येक पालकाची इच्छा असते की आपल्या मुलांनी खूप शिकावे आणि नाव कमवावे परंतु आर्थिक परिस्थिती पुढे काही चालत नाही. बरेच विद्यार्थी खूप असामान्य बुद्धिमत्तेचे असतात परंतु पैशांमुळे मागे राहतात.
तसे पाहायला गेले तर विविध बँकांमार्फत उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध केले जाते व शैक्षणिक कर्जाचा लाभ घेऊन बरेच विद्यार्थी शिक्षणात उज्वल यश संपादन करतात. अशाच उच्चशिक्षणाची उर्मी असलेल्या परंतु आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे आघाडीची बँक भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने विद्यार्थ्यांसाठी स्टुडन्ट टर्म लोन सुरू केले आहे.
ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्ज घ्यायचे असेल अशा विद्यार्थ्यांना ही खूप मोठी संधी आहे.भारतात आणि परदेशात शिक्षण घेणारे विद्यार्थी या कर्जासाठी अर्ज करू शकतात.
नक्की वाचा:आता घरबसल्या मिळवा 35 लाखांपर्यंत कर्ज, SBI बँकेची एकदम ऑफर सुरू, जाणून घ्या सविस्तर
काय आहे नेमकी ही लोन सुविधा?
या योजनेच्या माध्यमातून पीजी, युजी, आयआयटी, सारख्या काही स्वायत्त संस्थांच्या डिप्लोमा कोर्ससाठी 50 लाखांपर्यंत कर्ज देखील या माध्यमातून मिळू शकते
एवढेच नाही तर एमबीए, एम एस आणि एम सी ए सारख्या रोजगारभिमुख अभ्यासक्रमांसाठी देखील परदेशात नामांकित संस्थांमधून शिक्षण घ्यायचे असेल तर जास्तीत जास्त दीड कोटींच्या कर्जाचा अर्ज आपण करू शकतो.
तुम्ही हे कर्ज घेतल्यानंतर तुमचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्याच्या नंतर पंधरा वर्षातया कर्जाची परतफेड होते.अभ्यासक्रम जेव्हा पूर्ण होतो त्यानंतर कर्जाची रक्कम जास्तीत जास्त पंधरा वर्षाच्या कालावधीत परत केली जाऊ शकते. या कर्जासाठी चा व्याजदर 8.65 टक्के असून मुलींना व्याजदरात 0.5 टक्के सूट मिळेल.
याकर्जाचे विशेष म्हणजे तुम्ही जेव्हा वीस लाखांपर्यंत कर्ज घ्याल तेव्हा वीस लाखांपर्यंत कोणतेही प्रवेशशुल्क भरावे लागणार नाही.वीस लाखांपेक्षा जास्त रकमेचे कर्ज असेल तर दहा हजार रुपयांच्या प्रोसेसिंग फी सोबत कर भरावा लागेल.चार लाखांपर्यंतच्या रकमेसाठी मार्जिन पेमेंट ची आवश्यकता नाही.
नक्की वाचा:खरं काय! आता नवरा बायको दोघांना मिळतील 10 हजार, वाचा 'या' योजनेची सविस्तर माहिती
नक्की वाचा:IRCTC:आता मिटली रेल्वे तिकीट बुकिंग चे समस्या, रेल्वेने बुकिंग मर्यादा केली दुप्पट
Published on: 06 June 2022, 10:22 IST