Education

HSC Board Exams: बारावीच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरूवात होत आहे. त्यामुळे आता विद्यार्थी तसेच पालकांच्या मनात धाकधूक निर्माण होत आहेत. कोरोनानंतर पहिल्यांदाच नियमित पद्धतीने परीक्षा होत असल्याने विद्यार्थी काहीसे तणावात दिसत आहे. बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी तर, दहावीची परीक्षा 2 मार्चपासून सुरु होत असल्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट केल्या.

Updated on 21 February, 2023 10:12 AM IST

विद्यार्थ्यांनो टेन्शन घेऊ नका

महाराष्ट्रात बारावीच्या परीक्षेला 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी बसले आहेत. संपूर्ण राज्यात 3195 केंद्रावर ही परीक्षा होत आहे. त्यामुळे शिक्षण मंडळाने काही दिशानिर्देश विद्यार्थ्यांना दिले आहेत. परीक्षा वेळेच्या अर्धातास आधी अर्धा तास उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परीक्षा अकरा वाजता सुरू होणार असून विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी म्हणजे साडेदहा वाजता हजर राहायचं आहे.

खळबळजनक बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याच्या फोन...

हेल्पलाईन क्रमांक -

परीक्षेच्या पहिल्याच दिवशी अनेकदा विद्यार्थी तणावात दिसतात. त्यामुळे अनेकदा गडबड होण्याची शक्यता असते. काहींचं हॉलतिकीट विसरून जातं तर काही जणांना वेगवेगळ्या पद्धतीने समस्या जाणवू लागतात.

त्यासाठी शिक्षण मंडळाने पाच ही जिल्ह्यात प्रत्येकी दोन समुपदेशक नियुक्त करण्यात आले आहेत. त्यासाठी काही संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. तुम्हाला काही अडचण आल्यास या क्रमांकावर फोन करू शकता.

कांदा उत्पादक शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांना रक्तानं लिहलं पत्र; केलं 'हे' महत्वाचं आवाहन

जिल्हा समुपदेश

औरंगाबाद बाळासाहेब चोपडे (९२८४८४७५८२)

शशीमोहन सिरसाट (९४२२७१५५४६)
बीड एस. पी. मुटकुळे (९६८९६४०५००)
चेतन सौंदळे (९४२२९३०५९९)
जालना एस. टी. पवार (९४०५९१३८००)
सूर्यकांत खांडेभरड (९४०४६०६४७९)
परभणी पी. एम. सोनवणे (९४२२१७८१०१)
आमिर खान (९८६०४४४४९८६)
हिंगोली एस. जी. खिल्लारे (९०११५९४९४४)
डी. आर. चव्हाण (९८२२७०६१०२)

English Summary: SSC HSC Exam Call this number immediately if you need any help!
Published on: 21 February 2023, 10:10 IST