Education

राज्यामध्ये बहुप्रतिक्षित आणि भरतीची तयारी करणारे तरुण चातकासारखे वाट पाहत असलेल्या भरतीला पोलीस भरतीला अखेर मुहूर्त लागला असून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह खात्याच्या बैठकीनंतर राज्यामध्ये पोलिसांची वीस हजार पदे भरण्यात येणार आहेत व या बाबतीत आता पोलीस भरती प्रक्रियेला वेग आला आहे.

Updated on 28 October, 2022 3:08 PM IST

राज्यामध्ये बहुप्रतिक्षित आणि भरतीची तयारी करणारे तरुण चातकासारखे वाट पाहत असलेल्या भरतीला पोलीस भरतीला अखेर मुहूर्त लागला असून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी गृह खात्याच्या बैठकीनंतर राज्यामध्ये पोलिसांची वीस हजार पदे भरण्यात येणार आहेत व या बाबतीत आता पोलीस भरती प्रक्रियेला वेग आला आहे.

याबाबत अधिकची माहिती अशी की, राज्य पोलीस मुख्यालयाने 2021 मध्ये जे काही पदे रिक्त झालेली होती त्या पदांची आरक्षण निहाय यादी जाहीर केली आहे.

नक्की वाचा:Naukari News: आनंदाची बातमी! आरोग्य विभागामध्ये लवकरच होणार 10 हजार पदांची भरती, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

यामध्ये सर्वात जास्त रिक्त जागा या मुंबई पोलीस दलात असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 14,956 पोलीस शिपाई पदे रिक्त आहेत व यासाठी खुल्या प्रवर्गासाठी 5468 पदांचा समावेश आहे. संबंधित पोलीस भरतीची प्रक्रिया ही नोव्हेंबर पासून सुरू होणार असून एक नोव्हेंबरला  प्रत्येक जिल्ह्यानुसार जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

यासंबंधीच्या सूचना पोलीस महासंचालकाकडून पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत. ज्या कोणाला या भरतीसाठी अर्ज करायचे असतील तरुण-तरुणी 3 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या दरम्यान पोलीस भरतीसाठी अर्ज करू शकतात.

जर तुम्हाला देखील या भरती विषयी सविस्तर माहिती हवी असेल तर तुम्ही  policerecruitment2022.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या वेबसाईटवर घेऊ शकतात.या भरतीसाठी एकूण 14 हजार 956 रिक्त जागा भरल्या जाणार असून यामध्ये सगळ्यात जास्त जागा म्हणजे 6740 जागा या मुंबई पोलीस दलात असून सर्वात कमी रिक्त जागा म्हणजे 21  या हिंगोली जिल्ह्यासाठी आहेत.

नक्की वाचा:Education News: विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! शैक्षणिक कर्ज हवे असेल तर आता दहा लाखांपर्यंत कर्ज मिळेल हमीशिवाय,वाचा डिटेल्स

 प्रवर्गनिहाय जागा

1- अनुसूचित जाती- एकूण 1811 जागा

2- अनुसूचित जमाती- एकूण 1350 जागा

3- विमुक्त जाती()- एकूण 426 जागा

4- भटक्या जमाती()- 374 जागा

5- भटक्या जमाती( )- एकूण 473 जागा

6- भटक्या जमाती()- एकूण 292 जागा

7- इतर मागासवर्ग- 2926 जागा

8- इडब्ल्यूएस- एकूण 1544 जागा

9- विमुक्त मागास प्रवर्ग- एकूण 292 जागा

10- सर्वसाधारण म्हणजेच खुला प्रवर्ग- 5468 एकूण जागा

 सर्व मिळून 14 हजार 956 रिक्त जागांसाठी ही भरती होणार आहे.

नक्की वाचा:​​Jobs 2022: सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण! आजच UPSC च्या या भरतीसाठी करा अर्ज; जाणून घ्या सविस्तर...

English Summary: maharashtra state goverment take decision to recruitment in police department
Published on: 28 October 2022, 03:08 IST