Education

कोरोना महामारीतुन सगळी परिस्थिती आता सावरत आहे. कोरोना आला तेव्हापासून जवळजवळ सर्वच प्रकारची भरती प्रक्रिया थांबविण्यात आल्या होत्या.

Updated on 26 March, 2022 9:19 PM IST

कोरोना महामारीतुन सगळी परिस्थिती आता सावरत आहे. कोरोना आला तेव्हापासून जवळजवळ सर्वच प्रकारची भरती प्रक्रिया थांबविण्यात आल्या होत्या.

त्यामुळे बरेच उमेदवार भरतीच्या जाहिरातीची चातकासारखे वाट पाहत आहेत. परंतु आता परिस्थिती सामान्य होत असताना विविध विभागांतर्गत भरतीसाठी च्या जाहिरातीजारी केल्या जात आहेत.अशीच एक सुवर्णसंधी दहावी पास उत्तीर्ण उमेदवारांसाठी चालूनआलेली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून ही भरती प्रक्रिया याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून ही भरती मल्टी टास्किंग स्टाफ( अ तांत्रिक)आणि हवालदार पदांच्या जागांचा समावेश आहे. ही भरती एकूण सात हजार सहाशे पदांसाठी घेतली जात असल्याचेसांगितले जात आहे.भरती संपूर्ण भारतात होणार आहे.

नक्की वाचा:मुक्त व्यवस्थापन पद्धती करते शेळीपालनातील खर्च कमी परंतु आहेत काही तोटे आणि फायदे; वाचा सविस्तर

 यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत

 ज्या इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा असेलअसे उमेदवार 30 एप्रिल 2022 पर्यंत अर्ज करू शकतात.23 मार्च 2022 पासून अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे.

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता

 या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवार हा किमान दहावी पास अथवा तत्सम विद्यालयाचा उत्तीर्ण असावा.

 या भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा

 मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार पदासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवार हा कमीत कमी 18 वर्षे व कमाल 25 वर्षे वयाचा असावा. राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार वयोमर्यादेत सूट असणार आहे.

नक्की वाचा:द्राक्ष बागांचे नुकसान होऊ नये यासाठी राज्य सरकार राबवणार हा प्रयोग; कृषी मंत्र्यांची घोषणा

 या भरतीसाठी निवड पद्धत

 हवलदार पदासाठी भरती प्रक्रिया व परीक्षापद्धती संगणकाधारित चाचणी व शारीरिक क्षमता चाचणी हवालदार पदासाठी असेल. मुख्य परीक्षा ही बहुपर्यायी पद्धतीची असेल.

या भरतीसाठी परीक्षा शुल्क

 या भरती प्रक्रियेसाठी खुल्या व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकरीता 100 रुपये शुल्क आकारण्यात येणार असून अनुसूचित जाती व जमातीतसेच अपंग उमेदवारांना परीक्षा शुल्क नाही.

 या भरतीसाठी ची परीक्षा केंद्र

1- पश्चिम विभाग-महाराष्ट्र,दादरा व नगर हवेली आणि दमण आणि दीव- औरंगाबाद, जळगाव, अमरावती, पुणे, कोल्हापूर, मुंबई, नागपूर,  नांदेड आणि नाशिक

English Summary: job oppourtunity to 10 th passed candidate in staaff selection commotion
Published on: 26 March 2022, 09:19 IST