Education

सध्या शिक्षण आणि नोकरी या सोबत करता येण्यासारख्या गोष्टी नाहीत. परंतु कमवता कमवता शिकता आले तर हा विचार बऱ्याच जणांच्या मनामध्ये येतो

Updated on 18 May, 2022 11:43 AM IST

ध्या शिक्षण आणि नोकरी या सोबत करता येण्यासारख्या गोष्टी नाहीत. परंतु कमवता कमवता शिकता आले तर हा विचार बऱ्याच जणांच्या मनामध्ये येतो

खास करून दहावी आणि बारावी उत्तीर्ण उमेदवार या टप्प्यावर येऊन बऱ्याच प्रमाणात बुचकळ्यात पडतात. बऱ्याच जणांची घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे नुसते शिक्षण घेणे अशक्य असते. त्यामुळे आपल्या घराला आर्थिक हातभार लावता आपल्याला शिक्षण घेता येईल तर ही संकल्पना खूप महत्त्वाची ठरते.

या संकल्पनेला धरूनच अग्रगण्य टाटा मोटर्सने कमवा आणि शिका या संकल्पनेवर आधारित सुवर्णसंधी कोणत्याही शाखातील बारावी पास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली  आहे. कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत मुलांना शिक्षण घेता घेता काम करून आर्थिक प्राप्ती देखील करण्याची संधी टाटा मोटर्सने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे.

 'कमवा आणि शिका' टाटा मोटर्सची योजना(Earn And Learn This Tata Motors Scheme)

 टाटा मोटर्स पुणे येथे एनटीटीएफ च्या माध्यमातून कोणत्याही शाखेत बारावी पास असलेल्या मुला मुलींसाठी कमवा व शिका योजना सुरू करण्यात आली असून या योजनेच्या माध्यमातून डिप्लोमा इन मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम मुलांना प्रत्यक्ष काम करता करता व कामाचा अनुभव घेता घेता पूर्ण करता येणार आहे.

एवढेच नाही तर यासाठी विद्यार्थ्यांना 12 हजार 850 रुपये विद्यावेतन देखील दिले जाणार आहे. त्यासोबत कॅन्टीन उपलब्ध करण्यात आली आहे. या कॅन्टीनमध्ये एक वेळचे जेवण, दोन वेळा चहा, नाश्ता अवघ्या पंधरा रुपये महिना शुल्काने दिला जाणार आहे. 

त्यासोबत मोफत बस सुविधा, युनिफॉर्म, सेफ्टी शूज, हेल्थ इन्शुरन्स इत्यादी सुविधा देखील विद्यार्थ्यांना दिला जाणार असून डिप्लोमा इन मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी चा अभ्यासक्रमाचा कालावधी हा तीन वर्षे आहे.

 टाटामोटर्स बद्दल थोडक्यात माहिती(Information To Tata Motors)

 टाटा मोटर्स ही भारतातील सर्वात मोठी व्यवसायिक वाहने बनवणारी टाटा समूहाची कंपनी कंपनी असून विविध प्रकारचे ट्रक हे या कंपनीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

जर मागील पंधरा ते वीस वर्षाचा विचार केला तर टाटा मोटर्सने लहान व मध्यम वाहनांमध्ये लक्षणीय झेप घेतली आहे. या कंपनीने जगातील सर्वात स्वस्त गाडी बनवण्याचा ध्यास घेतला असून त्यांना एक लाख रुपयात टाटा नॅनो सादर केली होती. तसेच प्रसिद्ध लँड रोवर व जग्वार या ब्रिटिश वाहन कंपन्या या कंपनीने विकत घेतले.

त्यामुळे टाटा मोटर्स या कंपनीचा व त्या निमित्ताने भारताचा आंतरराष्ट्रीय वाहन निर्मितीत  दबदबा वाढला आहे.

या कंपनीचा पुणे येथे मोठा कारखाना असून पुणे शहराची एक इंडस्ट्रिअल सिटी म्हणून  नावलौकिक मिळवण्यात कंपनीचा मोठा वाटा आहे. तसेच जमशेदपूर येथे देखील मोठा कारखाना आहे.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:बंधुंनो सावधान! जर तुम्ही कुणाला तुमच्या आधार आणि पॅन कार्डची प्रत देत असाल तर निघू शकते तुमच्या नावाने परस्पर लोन

नक्की वाचा:महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन केरळ आणि बिहारच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू

नक्की वाचा:बातमी कामाची: सोलर पंप योजनेचा आजच घ्या लाभ; 'या' जिल्ह्यात नोंदणी कार्य सुरु

English Summary: job oppourtunity in tata motors by earn and learn concept so take chance
Published on: 18 May 2022, 11:43 IST