Education

आपण आताच्या तरुणांचा विचार केला तर त्याच्यासाठी एक नोकरी सोडून दुसरी नोकरी मिळवणे इतके अवघड नाही. कारण त्यांच्या शिक्षणानुरूप नोकरीच्या शोधात तरुण असतात. नोकरी बदलण्याचे प्रमाण हे खाजगी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. जर तसे पाहायला गेले तर भविष्यातील उत्तम करिअरच्या चांगल्या वाढीसाठी नोकरी बदलणे गरजेचे देखील आहे.

Updated on 20 September, 2022 3:00 PM IST

आपण आताच्या तरुणांचा विचार केला तर त्याच्यासाठी एक नोकरी सोडून दुसरी नोकरी मिळवणे इतके अवघड नाही. कारण त्यांच्या शिक्षणानुरूप नोकरीच्या शोधात तरुण असतात. नोकरी बदलण्याचे प्रमाण हे खाजगी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. जर तसे पाहायला गेले तर भविष्यातील उत्तम करिअरच्या चांगल्या वाढीसाठी नोकरी बदलणे गरजेचे देखील आहे.

परंतु आपण नोकरी सोडल्यानंतर संबंधित कंपनी कडून काही बाबी पूर्ण करणे गरजेचे असते.  यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब असते ती फुल अँड फायनल सेटलमेंट ही होय.

नक्की वाचा:मोठी बातमी! 15 आणि 16 ऑक्टोबरला होणारी आरोग्य विभागाची परीक्षा रद्द, ही आहेत कारणे

 'फुल अँड फायनल सेटलमेंट' म्हणजे काय?

 समजा आपण एखाद्या कंपनीतली नोकरी सोडली याचा अर्थ त्या कंपनीशी आपला काहीच संबंध राहत नाही असे होत नाही. कारण तोपर्यंत फुल अँड फायनल सेटलमेंट होत नाही तोपर्यंत त्या कंपनीशी आपला संबंध राहतोच.

फुल अँड फायनल एक फॉर्मलिटी असून नोकरी सोडताना ती संबंधित कर्मचाऱ्यामार्फत पार पाडली जाते. म्हणजे जेव्हा नोकरीतून राजीनामा दिला जातो,  त्यावेळी तुम्हाला संबंधित कंपनीच्या सर्व विभागांकडून नो ड्युज घ्यावे लागते.

नक्की वाचा:Agri Education: शेतकरी पुत्रांनो! 'कृषी अभियांत्रिकी' क्षेत्र आहे करिअरसाठी खूपच उत्तम, वाचा याबद्दल माहिती

 म्हणजे कंपनीची तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची मालमत्ता नाही आणि कंपनी या संदर्भात तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा दावा करणार नाही. हा नो ड्युज पूर्ण केल्यानंतर कंपनी कडून तुम्हाला काही पेमेंट केले जाते व या पेमेंटमध्ये तुम्हाला नोटीस पिरियड मध्ये जो पगार मिळत नाही तो या पेमेंट मध्ये दिला जातो. यामध्ये लिव्ह इनकॅशमेंट देखील समाविष्ट आहे.

एवढेच नाही तर तुम्ही ग्रॅच्युईटीसाठी पात्र असाल तर तुम्हाला त्याचा देखील लाभ मिळतो आणि कॉन्ट्रॅक्टच्युअल ड्युज देखील दिला जातो. त्यामुळे एखाद्या नोकरीचा राजीनामा देऊन लगेच बाहेर पडण्यापेक्षा कंपनीकडून तुमची कोणत्याही प्रकारची थकबाकी मिळण्याची खात्री करणे गरजेचे असून सगळ्या विभागांकडून नो ड्युज पूर्ण झाल्यानंतर कंपनी आपले उर्वरित पेमेंट करते.

नक्की वाचा:कौतुकास्पद उपक्रम! 'या' शाळेमध्ये विद्यार्थ्यांना दिले जाते शेतीचे शिक्षण,1 ली ते 10 वीच्या विद्यार्थ्यांचे योगदान

English Summary: if you quit job so fool and final settlement is so important for you
Published on: 20 September 2022, 03:00 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)