Education

संरक्षण क्षेत्रातील भरती आर्मी, बीएसएफ असो इतर अर्धसैनिक बल इत्यादींच्या भरतीसाठी विशेष करून ग्रामीण भागातील तरुण फार मोठ्या प्रमाणात कष्ट करून तयारी करतात. परंतु बऱ्याच दिवसांपासून संरक्षण क्षेत्रातील सगळ्याच भरत्या थांबविण्यात आलेल्या होत्या. परंतु आता विविध प्रकारच्या भरतीच्या जाहिराती येत असून बेरोजगार तरुणांसाठी आणि विशेष करून आर्मी भरतीची तयारी करणाऱ्या युवकांसाठी मोठ्या संधी निर्माण होत आहेत.

Updated on 24 August, 2022 3:10 PM IST

संरक्षण क्षेत्रातील भरती आर्मी, बीएसएफ असो इतर अर्धसैनिक बल इत्यादींच्या भरतीसाठी विशेष करून ग्रामीण भागातील तरुण फार मोठ्या प्रमाणात कष्ट करून तयारी करतात. परंतु बऱ्याच दिवसांपासून संरक्षण क्षेत्रातील सगळ्याच भरत्या थांबविण्यात आलेल्या होत्या. परंतु आता विविध प्रकारच्या भरतीच्या जाहिराती येत असून बेरोजगार तरुणांसाठी आणि विशेष करून आर्मी भरतीची तयारी करणाऱ्या युवकांसाठी मोठ्या संधी निर्माण होत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता जर तुम्ही दहावी पास असाल तर इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस अर्थात आयटीबीपी मध्ये भरती होण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे.  यामध्ये दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी कॉन्स्टेबल( पायनियर) पदासाठी अर्ज मागविण्यात आले असून आयटीबीपी कॉन्स्टेबल च्या 108 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

नक्की वाचा:Mpsc Recruitment: सुवर्णसंधी! एमपीएससीमार्फत 961 जागांसाठी मोठी भरती,वाचा सविस्तर माहिती

 पदे पदसंख्या

1- कॉन्स्टेबल( सुतार)- एकूण 56 जागा

2- कॉन्स्टेबल( मेसन)- एकूण 31 जागा

3- कॉन्स्टेबल( प्लंबर)- 21 जागा इत्यादी पदे भरली जाणार आहेत.

 अर्ज करण्याची अंतिम तारीख

 इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये कॉन्स्टेबल पदासाठी भरती ची अर्ज प्रक्रिया ही 29 ऑगस्टपासून सुरू झाली आहे वयाची अंतिम मुदत 17 सप्टेंबर 2022 पर्यंत असून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता.

 आवश्यक पात्रता

 इंडो-तिबेट बॉर्डर फॉर्स या मधील कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी दहावी पास असणे आवश्यक असून उमेदवाराने संबंधित ट्रेड मधून आयटीआय एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम करणे आवश्यक आहे.

 वयोमर्यादा

 या पदांच्या भरतीसाठी अर्जदाराचे वय कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 23 वर्षांच्या दरम्यान असणे गरजेचे आहे.

नक्की वाचा:Recruitment: महिला बालविकास विभागात नोकरीची संधी, घाई करा 19 ऑगस्ट अर्ज करण्याची अंतिम तारीख

 अर्ज करण्याचे शुल्क

मेसन, कारपेंटर आणि प्लंबर या पदांसाठी अर्ज करण्यासाठी जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे तर एससी/ एसटी/ महिला आणि माजी सैनिक उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया

 या भरतीतील असलेल्या पदांसाठी निवड ही फिजिकल टेस्ट आणि लेखी चाचणी च्या माध्यमातून केली जाणार आहे.

 ऑनलाइन अर्ज करण्याचे संकेतस्थळ

 या भरतीसाठी मला अर्ज करायचा असेल तर तुम्ही आयटीबीपी च्या अधिकृत वेबसाईट recruitment.itbpolic.nic.in वर जाऊन अगोदर नोंदणी करावी लागणार आहे व त्यानंतर तुम्हाला अर्ज करता येणार आहे.

नक्की वाचा:पोस्ट खात्यात मेगाभरती: भारतीय पोस्ट विभागाकडून तब्बल 1 लाख जागांसाठी मोठ्या भरतीची घोषणा, वाचा तपशील

English Summary: good recruitment chance in indo tibet border police
Published on: 24 August 2022, 03:10 IST