Education

आपल्याला माहित आहेच की, लहान मुले ही मातीच्या गोळ्यासारखे असतात.जसे आपण मातीच्या गोळ्याला आकार देतो त्यानुसार त्यापासून निर्मिती होत असते. अशीच काहीशी बाब ही लहान मुलांच्या बाबतीत देखील लागू होते. लहानपणापासून मुलांना तुम्ही जसे घडवाल किंवा ज्या पद्धतीचे वातावरणात ते वाढतील त्याचा संपूर्णपणे प्रभाव मुलांच्या पुढील आयुष्यावर होत असतो.

Updated on 18 September, 2022 1:12 PM IST

आपल्याला माहित आहेच की, लहान मुले ही मातीच्या गोळ्यासारखे असतात.जसे आपण मातीच्या गोळ्याला आकार देतो त्यानुसार त्यापासून निर्मिती होत असते. अशीच काहीशी बाब ही लहान मुलांच्या बाबतीत देखील लागू होते. लहानपणापासून मुलांना तुम्ही जसे घडवाल किंवा ज्या पद्धतीचे वातावरणात ते वाढतील त्याचा संपूर्णपणे प्रभाव मुलांच्या पुढील आयुष्यावर होत असतो.

जर आपण लहान मुलांच्या बाबतीत विचार केला तर अगदी सुरुवातीपासूनच एखाद्या विशिष्ट गोष्टींची सवय त्यांना लावली तर ती सवय त्यांना आयुष्यभर राहते. एखाद्या गोष्टीत निर्माण केलेली आवड हे संपूर्ण आयुष्यभर टिकते.

याच तत्त्वाला धरून नाशिक येथील एका शाळेने एक कौतुकास्पद उपक्रम काही वर्षांपूर्वी सुरू केला असून या शाळेत पुस्तकी अभ्यासासोबतच शेतीसंबंधीचा अनुभव विद्यार्थ्यांना यावा व त्यांची बौद्धिक कुवत वाढावी यासाठी शाळेने चांगले प्रयत्न केले आहेत. या कौतुकास्पद उपक्रमाची बातमी एबीपी माझाने दिली आहे.काय आहे नेमका शाळेचा उपक्रम? याची माहिती घेऊ.

नक्की वाचा:LIC Scheme: 'या' सरकारी योजनेतुन वृद्धांना दरमहा 9 हजार रुपयांपर्यंत मिळते पेन्शन; असा करा अर्ज

नाशिक मधील इस्पेलियर शाळेचा स्तुत्य उपक्रम

 ही शाळा नाशिक शहरातील त्र्यंबकेश्वर रोडवर असून या शाळेचे विद्यार्थी शाळेच्या एका छोटेखानी शेतीमध्ये शेती करतात. म्हणजे या शाळेमध्ये मुलांना शेतात नेले जाते व शेती संबंधित ज्ञान दिले जाते. यासाठी शाळेने ग्राउंडमध्ये छोटेसे शेत विकसित केले आहे.

यामध्ये विद्यार्थी भेंडी,टोमॅटो तसेच मिरचीची लागवड देखील करतात तर कोणी इंद्रायणी भात पिकाची निगा राखतात. म्हणजेच जर आपण पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर या सर्व गटातील विद्यार्थी या शेतीमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचे काम करून आपला सहभाग नोंदवतात.

यामध्ये शेतीमध्ये लागणारी मशागत करणे तसेच विविध पिकांची लागवड त्यांची निगा राखणे व तयार झालेला भाजीपाला तोडून त्याचा स्वाद शाळेतच घेणे इत्यादी अनुभव विद्यार्थ्यांना शाळेतच मिळत आहे.

नक्की वाचा:Success Story: उच्चशिक्षित तरुणाने नोकरीला ठोकला रामराम! देशी गायींचे गोमूत्र आणि दूध विकून करतोय करोडोंची कमाई

 याचा परिणाम असा होतो की शेती बाबतीतला अनुभव विद्यार्थ्यांना विद्यार्थीदशेतच मिळत असून नेमके शेतकऱ्यांचे प्रश्न किंवा कामाची पद्धत त्यांना कळत आहे.

कारण शेती एक माणसाला संयमी राहण्याचे शिकवते म्हणजेच एक रोप लावले तर काही महिन्यानंतर त्याला फळे फुले लागतात व हातात उत्पादन मिळते.या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांमधील संयम हा गुण वाढण्यास मदत होते.

विशेष म्हणजे हा जो काही शेतीचा अभ्यासक्रम आहे हा या शाळेने स्वतः तयार केला असून दर आठवड्यात शेतीचा तास असतो.

यामुळे शेतीच्या विविध टप्प्यांचा समावेश करण्यात आला असून यामध्ये विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकसोबतच इतर  निरीक्षण करण्याची क्षमतादेखील वाढण्यास मदत होत आहे. समजा काही विद्यार्थ्यांना फूड इंडस्ट्री किंवा इतर व्यवसायासोबत आधुनिक शेती करण्याचे स्वप्न असेल तर त्यांचा पाया विद्यार्थी अवस्थेतच पक्का होण्यास यामुळे मदत होत आहे.

नक्की वाचा:Upcoming Oppurtunity: 'एअर कॉलिटी मॅनेजमेंट'क्षेत्र येणाऱ्या 3 ते 5 वर्षात देईल भरपूर संधी, वाचा सविस्तर

English Summary: give agricultural education in isperious school in nashik to student
Published on: 18 September 2022, 01:12 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)