Education

पाच ते दहा लाखांच्या कर्जावर दाेन टक्के आणि १० ते १५ लाखांपर्यंतच्या कर्जाला चार टक्के व्याज आकारणी हाेईल. त्याच्या परतफेडीचा कालावधी १० वर्षांचा आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून राज्य सहकारी बँकेने (शिखर) श्रमविद्या शैक्षणिक कर्ज याेजना सुरू केली. बारावीच्या पुढे पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी पाच लाखांचे कर्ज बिनव्याजी असेल.

Updated on 20 May, 2023 12:08 PM IST

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून राज्य सहकारी बँकेने (शिखर) श्रमविद्या शैक्षणिक कर्ज याेजना सुरू केली. बारावीच्या पुढे पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी पाच लाखांचे कर्ज बिनव्याजी असेल. पाच ते दहा लाखांच्या कर्जावर दाेन टक्के आणि १० ते १५ लाखांपर्यंतच्या कर्जाला चार टक्के व्याज आकारणी हाेईल. त्याच्या परतफेडीचा कालावधी १० वर्षांचा आहे.

बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी ही माहिती दिली. ‘राज्यात आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या ७६,३०१ इतकी आहे. त्यांच्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची परवड हाेत आहे. आधीच डोक्यावर कर्जाचा डाेंगर असताना, उदरनिर्वाहाचा प्रश्न प्राधान्याने साेडवताना इच्छा असूनही मुलांना उच्च शिक्षण देता येत नाही. त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी ‘श्रमविद्या’ योजना राबवण्यात येत आहे.’

पदवीनंतर १२ महिन्यांनी परतफेड

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १२ महिन्यांनी सुरू कर्ज परतफेडीला सुरुवात होईल.
उर्वरित कालावधीत समान मासिक हप्त्यात परतफेड होईल. प्रक्रिया शुल्क लागणार नाही.
पाच लाखांपर्यंतच्या कर्जाला तारण अथवा जामीनदाराची गरज नाही. कर्जाचा एकूण कालावधी कमाल १० वर्षे असेल.

कर्जासाठी ही कागदपत्रे आवश्यक

बारावीची गुणपत्रिका, महाविद्यालय अथवा विद्यापीठातील प्रवेशाचा पुरावा, शैक्षणिक शुल्काचे विवरणपत्रक, शेतकरी पित्याच्या मृत्यूचा दाखला, एकल माता असल्याची नाेंद, महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचा पुरावा, उत्पन्न दाखला.

कामाची बातमी! या नंबरवर मिसकॉल द्या अन् मुख्यमंत्री सहायता निधी मिळवा, सरकारचा मोठा निर्णय...

विदेशात शिक्षणासाठीही मिळणार लाभ

 २००३ ते २०२३ या दाेन दशकांच्या कालावधीत अात्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुले पात्र. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत योजना लागू. प्रक्रिया शुल्क नाही. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यावसायिक पदवी घेण्यासाठी शिक्षण घेणारे विद्यार्थी याेजनेस पात्र ठरतील. शासकीय, स्वायत्त अथवा खासगी महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच परदेशातील शिक्षणासाठीही याेजना लागू.

अंदमानात 3 दिवस आधीच मान्सून दाखल; महाराष्ट्रात 'या' तारखेला होणार आगमन

English Summary: Children of farmers will get cheap loan, repayment period 10 years
Published on: 20 May 2023, 12:08 IST