महाराष्ट्र शासनातील ग्रामविकास विभागाच्या गट क अंतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागाची 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या होऊ घातलेल्या परीक्षा संबंधीचे नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असून ही परीक्षा रद्द होण्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे नेमके याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा होणार असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
आरोग्य विभागाची ही परीक्षा प्रत्येक जिल्ह्यात होणार असून जिल्हाधिकार्यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा दुय्यम निवड मंडळामार्फत ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
या अगोदरचे वेळापत्रक पाहिले तर 15 आणि 16 ऑक्टोबरला या पदांसाठी परीक्षा होणार होती व 17 ते 31 ऑक्टोबर दरम्यान या परीक्षेचा निकाल जाहीर करून यासाठी पात्र उमेदवारांची यादी सुद्धा जारी करण्यात येणार होती. परंतु आता ही परीक्षा रद्द करण्यात येणार असून नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.
या पदांसाठी होणार आहे ही परीक्षा
ही परीक्षा गट क मध्ये आरोग्यसेवक, आरोग्य सेविका तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या पाच पदांसाठी ही भरती प्रक्रिया मुख्यत्वेकरुन राबवली जाणार असून जिल्हा निवड मंडळामार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे.
वर्षी 24 ऑक्टोबर रोजी आरोग्य विभागाची गट-अ आणि गट-ब प्रवर्गासाठी परीक्षा झाली होती. परंतु त्यावेळी या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे समोर आले होते त्यामुळेही परीक्षा घेण्यात अडचणी आल्या होत्या.मागच्या
Published on: 20 September 2022, 12:55 IST