सध्या मोठ्या प्रमाणात सरकारी विभागांतर्गत भरती प्रक्रिया राबवली जात असून याचा फायदा जास्तीत जास्त तरुणांनी घेण्याची आवश्यकता आहे.कारण आपल्याला माहित आहेच की गेल्या दोन ते अडीच वर्षापासून कोरोना महामारीच्या कालावधीत थांबविण्यात आलेल्या सगळ्या भरती प्रक्रिया मोठ्या प्रमाणात आता राबवल्या जात आहेत.
या पार्श्वभूमीवर आता तरुणांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली असून कर्मचारी निवड आयोग कडून भरती संदर्भात एक अपडेट देण्यात आली आहे. या अंतर्गत आता एकत्रित स्तर पदवी परीक्षा 2022 च्या ग्रुप सी आणि बी भरतीचे नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून या माध्यमातून मंत्रालयातील विविध विभागांमध्ये भरती केली जाणार आहे.
या भरती च्या माध्यमातून विविध मंत्रालये तसेच सरकारी विभाग व संस्थांमध्ये ग्रुप बी आणि सी च्या एकूण वीस हजार रिक्त जागा भरल्या जातील.
नक्की वाचा:मोठी बातमी! 15 आणि 16 ऑक्टोबरला होणारी आरोग्य विभागाची परीक्षा रद्द, ही आहेत कारणे
कोण करू शकतो अर्ज?
यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतुन पदवी प्राप्त केलेली असावी व सर्व पदांसाठी अर्जाची पात्रता वेगवेगळी आहे.एसएससी सिजीएलमध्ये कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठातून बॅचलर पदवी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.
या अंतर्गत भरली जाणारी पदे
या भरती अंतर्गत सरकारच्या विविध विभागातील सहाय्यक, सहाय्यक अधिकारी तसेच निरीक्षक उपनिरीक्षक, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, लेखापाल तसेच लेखापरीक्षक, अप्पर विभागीय लिपिक अशा पदांचा समावेश आहे.
निवड कशी केली जाईल?
या भरती अंतर्गत टियर-1, टियर-2, टियर-3 आणि टियर-4 परीक्षांमधील कामगिरीच्या आधारावर उमेदवारांची निवड करण्यात येणार असून यामधील टियर 1 व टियर2 ही संगणक आधारित परीक्षा असणार असून टियर-3 परीक्षा ही वर्णनात्मक असणार आहे तर टियर-4 कौशल्य चाचणी यामध्ये संगणक प्रविणता चाचणी किंवा डेटाएंट्री चाचणी असेल.
या भरतीच्या महत्त्वाच्या तारखा
1- ऑनलाईन अर्ज सुरू- 17 सप्टेंबर 2022
2- शेवटची तारीख- 8 आक्टोबर रात्री अकरा वाजेपर्यंत
3- ऑनलाइन अर्ज फी जमा करण्याची शेवटची तारीख- नऊ ऑक्टोबर 2022 रात्री अकरा वाजेपर्यंत आणि चलनच्या माध्यमातून शुल्क भरण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2022
4- वयाची मर्यादा- या भरती अंतर्गत ग्रुप सी साठी जे उमेदवार अर्ज करतील त्यांचे वय कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 27 वर्ष दरम्यान असावे. तर ग्रुप बी साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 30 वर्षे असावी.
यासाठी लागणारी फी
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शंभर रुपये अर्ज फी भरावी लागेल तसेच महिला, एससी आणि एसटी, पीडब्ल्यूडी आणि माजी सैनिकांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
Published on: 22 September 2022, 10:24 IST