बारावीनंतर बऱ्याचशा करिअरच्या संधी उपलब्ध असतात. कारण बरेच पालक करिअरच्या दृष्टिकोनातून विविध कोर्सेसची निवड आपल्या पाल्यांसाठी करतात. या लेखात आपण अशाच एका महत्त्वाच्या अभ्यासक्रमाबद्दल माहिती घेऊ.
बारावीनंतर एक महत्त्वाचा अभ्यासक्रम
केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया,आत्मनिर्भर भारत सारखे योजना सुरू असल्यामुळे विविध तांत्रिक कौशल्य आत्मसात केलेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारच्या संधी या माध्यमातून उपलब्ध होतात.
बारावीनंतर कॉमर्स, सायन्स तसेच आर्ट्स आणि एमसीवीसीया शाखेतील विद्यार्थ्यांना तांत्रिक क्षेत्रांमध्ये पारंगत बनवण्यासाठी भारतीय तंत्रशिक्षण मंडळाने बी.वोकेशनल कोर्सला मान्यता दिली आहे.
मुळात या अभ्यासक्रमाची रचना मनुष्यबळाची गरज काय आहे या दृष्टीने करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमामध्ये 40 टक्के थेअरी आणि 60 टक्के प्रक्टिकल ट्रेनिंग यामध्ये देण्यात येते. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून एक वर्ष पूर्ण होतो त्यानंतर डिप्लोमा,
दुसरे वर्ष पूर्ण केल्यानंतर ॲडव्हान्स डिप्लोमा व पूर्ण तीन वर्ष झाल्यानंतर विद्यार्थ्यांना बि. होक पदवी प्रदान करण्यात येते. हे अभ्यासक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र विद्यापीठ, पुणे विद्यापीठ या सोबतच अनेक प्रकारच्या शैक्षणिक संस्थांमध्ये देखील उपलब्ध आहेत.
या अभ्यासक्रमाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना लगेचच प्रॅक्टिकल अनुभवासाठी स्टायपेंड मिळण्याची देखील शक्यता असते.
या अभ्यासक्रमाची पदवी घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी तर मिळतातच परंतु स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व्यवसायदेखील सुरू करता येतो.
शिवाय बि.होक पदवीनंतर इतर कोणत्याही शाखेतील पदवीधर यांना ज्या संधी उपलब्ध असतात त्या व सगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसारख्या संधी देखील त्यामुळे उपलब्ध होतात.
या अभ्यासक्रमातील उपलब्ध शाखा
यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग,रिन्युएबल एनर्जी,ग्राफिक डिझायनिंग व मल्टिमीडिया,रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट तसेच मेकॅट्रॉनिक्स,
रिटेल मॅनेजमेंट इत्यादी शाखा उपलब्ध आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि रिटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता यावा यासाठी मारुती सुझुकी या कंपनीशी सामंजस्य करार देखील केला आहे.
Published on: 30 August 2022, 07:01 IST