ग्राहक जेव्हा कुठल्याही प्रकारचे वाहन खरेदी करतात तेव्हा सगळ्यात आगोदर ज्या प्रमाणात किमतीचा विचार केला जातो त्याच प्रमाणात गाडी पेट्रोल आहे की डिझेल आणि किती मायलेज देते याचा देखील विचार ग्राहक करतात. कारण मायलेज हा विषय तोपर्यंत आपल्याकडे कार आहे तोपर्यंत आपल्या खिशाशी संबंधित विषय आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
कारण गाडीची किंमत तरी एकदाच द्यावी लागते परंतु मायलेज हा आयुष्यभर आपल्या जीवनाशी निगडित असतो. त्यामुळे प्रत्येकजण कार किंवा दुचाकी घेताना मायलेजचा विचार प्रकर्षाने करतात.
जर आपण भारताचा विचार केला तर अलीकडील काळामध्ये अनेक प्रकारच्या एसयूव्ही लॉन्च होत असून यापैकी मारुतीची ग्रँड वितारा आणि टोमॅटोच्या अर्बन क्रुझर हायरायडर या दोन्ही गाड्या 27 किमी च्या पुढे प्रति लिटर मायलेज देतात. यासारख्या अजून काही जास्त मायलेज देणार्या एसयूव्हीची माहिती या लेखात घेऊ.
जास्त मायलेज देणार्या कार
1- टाटा नेक्सन- टाटा नेक्सॉन भारतातील सर्वाधिक विकली जाणारी एक एसयूव्ही कार
असून या कारची किंमत सात लाख 60 हजार ते 14 लाख आठ हजार रुपये इतकी असून या एक्स शोरूम किमती आहेत. ही 22 किमी प्रति लिटर इतका मायलेज देते. विशेष म्हणजे ही कार पेट्रोल आणि डिझेल अशा वर्जन मध्ये आहे.
2- हुंडाई क्रेटा- ही देखील जास्त प्रमाणात भारतात घेतली जाणारी कार असून तिची किंमत दहा लाख 44 हजार ते अठरा लाख 24 हजार इतकी आहे. मीड साइज एसयूव्ही पासून प्रति लिटर 21 किलोमीटरच्या जास्त मायलेज देते. या कारमध्ये पन्नास लिटर क्षमतेचे मोठी इंधन टाकी असून 1493 सीसी क्षमतेचे डिझेल इंजन आहे.
3-किया सोनेट- किया सोनेट ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही या मोटर्सने दहा लाखांच्या आत लॉंच केली आहे. या कारची किंमत सात लाख 50 हजार ते 13 लाख 99 हजार रुपयांच्या दरम्यान आहे.
या कारचे वैशिष्ट्य म्हणजे ही तीन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आली असून या कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असे पर्याय देण्यात आला आहे. ही कार 24 किमी च्या पुढे प्रति लिटर मायलेज देते. या कारमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक वैशिष्ट्ये देण्यात आले आहेत.
Published on: 06 October 2022, 05:30 IST