सध्या सणासुदीच्या मुहूर्तावर वाहन खरेदी करण्याची बर्याच जणांची लगबग असते. जर आपण सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे आता ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे जास्त प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे अनेक वाहन निर्मिती कंपन्यांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती देखील केली जात आहे.
प्रत्येक ग्राहकाची वाहन घेताना एक इच्छा असते ती म्हणजे कमीत कमी परवडणाऱ्या किमतीमध्ये आणि चांगली कार किंवा दुचाकी आपल्याला मिळावी. त्यासाठी प्रत्येक जणअशा वाहनांच्या शोधात असतात. त्यामुळे तुम्हाला देखील जर इलेक्ट्रिक कार स्वस्तात व चांगली वैशिष्ट्ये असलेली हवी असेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे.
नक्की वाचा:भारतात लवकरच लॉन्च होणार मोठ्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या संपूर्ण माहिती
सर्वात स्वस्त कार टाटा टियागो ईव्ही
देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार टाटा टियागो ईव्हीची बुकिंग टाटा मोटर्स येत्या 10 ऑक्टोबर पासून सुरू करणार आहे. याबाबतची माहिती कंपनीने दिली असून ग्राहक ही कार कंपनीच्या वेबसाईटवरून किंवा टाटा मोटर्सच्या वितरकाकडून एकवीस हजार रुपयांमध्ये बुक करू शकतात.
परंतु या कारची डिलिव्हरी 2023 पासून सुरू होणार आहे. तसेच या कारची डिलीवरी वेळ, तारीख आणि गाडीचा कलर आणि प्रकार यानुसार ठरवले जाणार आहे. या कारचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे व ती मागच्या वर्षी 28 सप्टेंबर लॉन्च करण्यात आली होती.
काय आहेत या कारचे वैशिष्ट्ये?
टाटा टियागो ईव्ही मध्ये फास्ट चार्जिंग साठी दोन ऑप्शन देण्यात आले असून 3.3kw सामान्य चार्जर संपूर्णपणे चार्ज होण्यासाठी पाच ते साडे सहा तास लागतात. त्याच वेळी 7.2kw एसी फास्ट चार्जर सह दहा टक्के ते शंभर टक्के पर्यंत चार्ज करण्यासाठी तीन तासापर्यंत वेळ लागतो.
तर डीसी फास्ट चार्जर सह चार्ज होण्यासाठी फक्त 57 मिनिटात दहा टक्के ते 80 टक्के पर्यंत चार्ज होते. या कारमध्ये 7.2kw चा एसी होम चार्जरचा पर्याय देण्यात आला असून यामुळे तुम्ही तुमची कार घरबसल्या सहजपणे चार्ज करू शकता.
या कारमध्ये Z कनेक्ट ॲपची कनेक्टिव्हिटी आणि 45 कनेक्टेड वैशिष्ट्यांसह मिळते. तसेच या कारमध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रेन सेंसिंग वायफर, ऑटोमॅटिक हेडलॅम्प, पुश बटन स्टार्ट/ स्टॉप आणि क्रूझ कंट्रोल यासारखे वैशिष्ट्ये या कारमध्ये देण्यात आली आहेत.
या कारची किंमत
या कारची सुरुवातीचे किंमत आठ लाख 49 हजार रुपये असून टॉप व्हेरीअन्ट साठी 11 लाख 79 हजार रुपये आहे. या किमती एक्स शोरूम आहेत व या किंमती केवळ दहा हजार युनिटच्या बुकिंग पर्यंत लागू असतील.
Published on: 07 October 2022, 04:54 IST