टाटा मोटर्स हे कंपनी भारतातील सर्वात मोठ्या कार उत्पादन करणाऱ्यांपैकी एक आहे जे की जगात या कंपनीला ओळखले जाते. भारतामध्ये लवकरच टाटा कंपनी मध्यम आकाराची SUV ब्लॅकबर्ड नावाची कार लाँच करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार टाटा कंपनीने या कारसाठी काम ही चालू केले आहे. टाटा ब्लॅकबर्ड ही SUV कार अगदी Nexon आणि Harrier या कारच्या सोबतच आपले स्थान मिळणार आहे. ब्लॅकबर्ड हे कार hundai कंपनीच्या मध्यम आकराच्या Creata या कार सोबत स्पर्धा करेल.
ब्लॅकबर्ड कधी होईल लाँच?
टाटा मोटर्स कंपनीने अजून ब्लॅकबर्ड गाडी कधी लाँच होईल याबद्धल काही माहिती सांगितली नाही, मात्र सूत्रांच्या माहितीनुसार टाटा मोटर्स आपली ब्लॅकबर्ड ही कार अगदी 2023 या वर्षाच्या सुरुवाती पर्यंत लाँच करेल असा अंदाज लावण्यात आलेला आहे. जे की ब्लॅकबर्ड तयार करण्यासाठी काम ही सुरू केले आहे. फक्त Creta च न्हवे तर त्यासोबत किआ सेल्टोस, एमजी एस्टर, वॉक्सवैगन टाइगन आणि स्कोडा कुशक ला सुद्धा टक्कर देणार आहे.
Nexon कार वर आधारित असेल ब्लॅकबर्ड :-
सूत्रांच्या माहितीनुसार टाटा ची ब्लॅकबर्ड ही कार Nexon X1 या कारच्या प्लॅटफॉर्म आधारित राहणार आहे. जे की ब्लॅकबर्ड या गाडीची डिझाइन ही Nexon च्या गाडी सारखीच मिळती जुळती असेल असे समजण्यात आले आहे. एवढेच नाही तर ब्लॅकबर्ड ला मोठ्या व्हीलबेस चा सुद्धा वापर करण्यात आलेला आहे. टाटा मोटर्स च्या येणाऱ्या ब्लॅकबर्ड गाडीला मोठ्या प्रमाणावर स्पेस सुद्धा मिळणार आहे. जे की ब्लॅकबर्ड ची जर Nexon सोबत तुलना केली तर पाठीमागील स्पेस हा मोठा भेटणार आहे आणि बूट स्पेस सुद्धा मोठ्या प्रमाणावर भेटणार आहे.
कसे असेल टाटा चे इंजन :-
इंजन विषयी बोलायचे म्हणले तर ब्लॅकबर्ड ला 1.5 लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजन असणार आहे तसेच 1.5 लीटर डिझेल इंजन चा पर्याय सुद्धा टाटा कंपनी देईल असा अंदाज आहे. इतर कार च्या तुलनेत ही कार लूक साठी अधिक आकर्षित करनार आहे.ब्लॅकबर्ड हे कार hundai कंपनीच्या मध्यम आकराच्या Creata या कार सोबत स्पर्धा करेल.
Published on: 06 September 2022, 12:51 IST