Automobile

नवी मुंबई : रॉयल इन्फिल्ड (Royal Enfield) ही भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात (Automobile Sector) एक नामांकित कंपनी म्हणुन ओळखली जाते. भारतातील क्रूझर बाइक सेगमेंटमध्ये या कंपनीचे वर्चस्व कायम राहिले आहे. कंपनीची प्रीमियम क्रूझर बाईक Royal Enfield Meteor 350 ही या सेगमेंटमधील एक लोकप्रिय बाइक असून लोकांच्या पसंतीस खरी उतरली आहे.

Updated on 27 May, 2022 11:23 AM IST

नवी मुंबई : रॉयल इन्फिल्ड (Royal Enfield) ही भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात (Automobile Sector) एक नामांकित कंपनी म्हणुन ओळखली जाते. भारतातील क्रूझर बाइक सेगमेंटमध्ये या कंपनीचे वर्चस्व कायम राहिले आहे. कंपनीची प्रीमियम क्रूझर बाईक Royal Enfield Meteor 350 ही या सेगमेंटमधील एक लोकप्रिय बाइक असून लोकांच्या पसंतीस खरी उतरली आहे.

या बाईकमध्ये रॉयल एनफिल्ड कंपनीने जबरदस्त लूक दिले आहेत शिवाय या बाईकला मजबूत इंजिन देखील देण्यात आले आहे. या बाईकच्या माध्यमातून लांबचा प्रवास अगदी सहज करता येतो. ही बाईक लांब प्रवास करणाऱ्या लोकांना विशेष पसंत पडत आहे. कंपनीने या बाईकचे स्टेलर व्हेरियंट मॉडेल भारतीय बाजारात 2 लाख 7 हजार 333 रुपयाच्या प्रारंभिक एक्स-शोरूम किंमतीसह बाजारात लॉन्च केले आहे.

या बाईकची ऑन रोड किंमत 2 लाख 34 हजार 444 रुपयापर्यंत जाते. जर तुम्हाला ही बाईक आवडत असेल आणि ती कमी बजेटमध्ये खरेदी करायची असेल, तर तुम्ही कंपनीने दिलेल्या फायनान्स प्लॅनचा फायदा घेऊन ही बाईक आपली बनवु शकता. आज आपण या गाडीवर दिल्या जाणाऱ्या बेस्ट फायनान्स प्लॅनविषयी जाणून घेणार आहोत.

Royal Enfield Meteor 350 Stellar variants वर उपलब्ध फायनान्स प्लॅन 

Royal Enfield Meteor 350 Stellar व्हेरियंटवर उपलब्ध असलेल्या फायनान्स प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर, कंपनी ही बाईक खरेदी करण्यासाठी बँकेकडून 2 लाख 11 हजार 444 रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून देते. या बाईकच्या खरेदीसाठी किमान डाउन पेमेंट म्हणून कंपनीला 23 हजार रुपये जमा करावे लागणार आहेत.

23 हजार डाउन पेमेंट भरल्यानंतर कर्जाची परतफेड करण्यासाठी बँक 5 वर्षे म्हणजेच 60 महिने देते. या कालावधीत, 6 हजार 433 रुपयाचा मासिक EMI भरून कर्जाची परतफेड केली जाऊ शकते. बँकेकडून मिळालेल्या या कर्जावर वार्षिक 9.7 टक्के दराने व्याज भरावे लागणार आहे.

Royal Enfield Meteor 350 स्टेलर व्हेरिएंटचे स्पेसिफिकेशन

Royal Enfield Meteor 350 Stellar या व्हेरिएंटमध्ये कंपनीने एअर-कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित सिंगल सिलेंडरसह 349 cc इंजिन उपलब्ध करून दिले आहे. या इंजिनची शक्ती 20.4 PS ची कमाल पॉवर आणि 27 मिमीचा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे.

कंपनी या इंजिनसह 5-स्पीड गिअरबॉक्स देते. ही बाइक 41.88 kmpl चा मायलेज देण्यास सक्षम असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे हे मायलेज ARAI द्वारे प्रमाणित करण्यात आले आहे. कंपनीने या बाईकच्या पुढच्या आणि मागील दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेक दिले आहेत, तसेच रॉयल एनफील्ड मेटिओर 350 स्टेलर व्हेरिएंट बाइकमध्ये ड्युअल चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम देखील देण्यात आले आहे. बाईकचे स्पोर्टी लुक आणि दमदार फिचर्स या बाईकला इतर बाईकपेक्षा वेगळे बनवते.

English Summary: Royal Enfield Bullet: Buy this Royal Enfield abandoned bike for 23 thousand; Know this offer
Published on: 27 May 2022, 11:23 IST