Automobile

सध्या डिजिटल पेमेंटचा वापर हा आता प्रत्येकजण करत आहे. डिजिटल पेमेंट पर्यायामुळे व्यवहार करण्यात अधिक सोयीस्कर जात आहे. लोक खरेदीसाठी डिजिटल पेमेंटचा अवलंब करतात.

Updated on 20 July, 2022 2:26 PM IST

सध्या डिजिटल पेमेंटचा (Digital Payments) वापर हा आता प्रत्येकजण करत आहे. डिजिटल पेमेंट (Digital Payments) पर्यायामुळे व्यवहार करण्यात अधिक सोयीस्कर जात आहे. लोक खरेदीसाठी डिजिटल पेमेंटचा (Digital Payments) अवलंब करतात. कारण मोबाईल वापरून UPI पेमेंट करणं सोपं आहे.

परंतु तुमचा मोबाइल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास तुम्ही UPI अकाऊंट डिलिट (Delete UPI Account) कसे करणार? याविषयी माहिती तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. मोबाईल कुठेतरी हरविला आणि तो चुकीच्या व्यक्तीच्या हाती गेला तर ते तुमचे Bank Account देखील रिकामे होऊ शकते. म्हणूनच UPI Payments वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तुमचा फोन चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास तुम्ही UPI खाते सहजपणे कसे डीएक्टीव्हेट करू शकता हे जाणून घेऊया.

लष्करी भागात तब्बल 50 हजार झाडे लावणार ; आयुक्त राजेश टोपे यांची मंजूरी

हे करा काम

फोन चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास, सर्वप्रथम तुमच्या मोबाइल नेटवर्कच्या कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हला कॉल करा आणि तुमचा मोबाइल नंबर आणि सिम त्वरित ब्लॉक करण्यास सांगा.

एक्झिक्युटिव्ह तुमचा मोबाइल नंबर वापरून UPI पिन तयार करणे प्रतिबंधित करेल. सिम ब्लॉक करण्यासाठी, कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव, बिलिंग पत्ता, शेवटचे रिचार्ज तपशील, ईमेल आयडी इत्यादी तपशील विचारू शकतात.

तुम्हाला तुमच्या बँकेच्या हेल्पलाइन नंबरवर कॉल करून तुमचे बँक खाते (bank account) ब्लॉक करण्यास आणि UPI सेवा बंद करण्यास सांगावे लागेल.

यानंतर तुम्हाला हरवलेल्या फोनसाठी एफआयआर नोंदवावा लागेल, याचा वापर करून तुम्ही तुमचे सिम आणि बँकिंग सेवा नंतर पुन्हा सुरू करू शकता.

मत्स्यपालनासाठी सरकार देतंय 60% अनुदान ; सरकारच्या 'या' योजनेचा घ्या लाभ

English Summary: Phone lost stolen Deactivate UPI account
Published on: 20 July 2022, 02:26 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)