Jio Laptop: रिलायन्स जिओ (Reliance Jio) कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन गोष्टी मार्केटमध्ये आणत आहे. मोबाईलनंतर आता या कंपनीने आपला लॅपटॉप (Jio Laptop) देखील मार्केटमध्ये आणला आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच जिओ कंपनी आपला जिओ बुक (Jio Book) नावाने पहिला लॅपटॉप मार्केटमध्ये लॉन्च केला आहे.
जिओबुकची किंमत
कंपनीने या जिओ बुकला १५ हजार ७९९ रुपये किंमतीत लाँच केले आहे. याला Reliance Digital ऑनलाइन स्टोर वरून खरेदी करू शकता. याला ईएमआयवरून सुद्धा खरेदी करू शकता.
क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवरून पेमेंट केल्यास ५ हजार रुपयांपर्यंत इंस्टेंट डिस्काउंट दिला जात आहे. Axis, Kotak, ICICI, HDFC, AU, IndusInd, DBS, Yes आणि इतरांसह प्रमुख बँक क्रेडिट कार्डांसह, लॅपटॉप खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 10% झटपट सूट मिळू शकते.
आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस, जाणून घ्या 'वसुबारस' चे महत्व..
JioBook चे फीचर्स
1. LTE सपोर्ट दिले आहे. यात तुम्हाला सिम कार्डचा सुद्धा वापर करू शकता.
2. ११.६ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. याचा पिक्सल रिझॉल्यून 1366 x 768 आहे.
3. लॅपटॉप ऑक्टाकोर सीपीयू सोबत येते. तर यात Jio OS दिले आहे.
4. लॅपटॉप ८ तासाच्या बॅटरी लाइफ सोबत येतो.
5. लॅपटॉप मध्ये २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज दिले आहे.
6. मायक्रोएसडी कार्डद्वारे १२८ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते.
मोठी बातमी: 35 हजार शेतकऱ्यांचे 964 कोटींची कर्जे माफ; सरकारचा मोठा निर्णय
Published on: 21 October 2022, 09:55 IST