गेल्या काही दिवसांपासून गाड्यांच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. असे असले तरी आता थोडे पैसे भरून आपण गाडी खरेदी करू करतो, याबाबत अनेक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. असे असताना आता तुम्ही गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला घाई करावी लागणार आहे. याचे कारण म्हणजे १ जुन नंतर गाड्यांच्या किमती वाढणार आहेत. यामुळे तुम्हाला आर्थिक झळ बसणार आहे.
विमा कंपन्यांमुळे (Insurance Company) कार घेणे महाग होणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने थर्ड पार्टी इन्शुरन्सच्या प्रीमियममध्ये वाढ (Increase In Third Party Insurance Premium) केली आहे. त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहने घेणे खर्चिक होणार आहे. नवीन विम्याच्या किमती 1 जूनपासून लागू होणार आहेत. यामुळे याचा फटका तुमच्या खिश्याला बसणार आहे.
गाड्यांचा वाढणाऱ्या या खर्चाच्या मागे कंपनी नसून विमा कंपन्या आहेत. याबाबत झाले असे की, नवीन दुचाकींवर 17% जास्त प्रीमियम तुम्ही 1 जून किंवा त्यानंतर नवीन दुचाकी खरेदी केल्यास, त्याचा थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियम 17% अधिक होईल. याचा याचा अतिरिक्त बोजा तुमच्यावर पडणार आहे. यामुळे किमती वाढणार आहे. यामुळे थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियममध्ये वाढ केल्याने वाहनाचे अंतिम मूल्य वाढेल.
यावर्षीही शेती परवडणार की नाही? बियाणांच्या दरात मोठी वाढ, सोयाबीन बॅग मागे 1 हजाराची वाढ
ज्याचे इंजिन (Engine) 150cc पेक्षा जास्त पण 350cc पेक्षा कमी असेल तर तुम्हाला त्याच्या विम्यावर 15% जास्त खर्च करावा लागेल. अशा दुचाकीसाठी 1366 रुपयांपर्यंत खर्च करावा लागणार आहे. 350cc किंवा त्याहून अधिक पॉवरचे इंजिन असलेल्या दुचाकीसाठी 2,804 रुपये खर्च करावे लागतील. या किमती थर्ड पार्टी इन्शुरन्ससाठी आहेत. याबाबत अधिक माहिती पुढील दिवसात समजेल.
तसेच तुम्ही 1 जून नंतर नवीन कार खरेदी करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियमवर 23% अधिक खर्च करावा लागेल. असा बदल होणार आहे, यामुळे हा बदल १ जून नंतर लागू होणार असल्याने जर तुम्हाला गाडी घ्याची असेल तर तुम्हाला घाई करावी लागणार आहे. यामुळे तुमचेच पैसे वाचणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
वाढलेले दुधाचे दर केंद्राला बघवेनात, केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे दूध दरात कपात
अतिरिक्त उसावर आता प्रशासनही हतबल, आता ऊस फडातच राहणार? पहा आकडेवारी
'या' भांड्यामध्ये ठेवा दूध, उन्हाळा असो किंवा पावसाळा तरी खराब नाही होणार
Published on: 28 May 2022, 02:53 IST