मोबाइल चोरीची प्रकरण वाढत चालली आहेत. त्यामुळे यासंदर्भात सरकार लवकरच मोठे अपडेट आणणार आहे. या पर्यायाने मोबाइल (mobile) चोरीला गेलेला सहज तुम्हाला ब्लॉक करता येणार आहे. जेणेकरून तुमचा वैयक्तिक डाटा लिक होणार नाही.
तुम्हाला हे माहिती असणे गरजेचे आहे की प्रत्येक फोनला एक विशेष IMEI नंबर दिलेला असतो. हा नंबर तुमची डिव्हाइस ट्रॅक (Device Track) करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. सध्या मोबाईल चोरीचं किंवा ब्लॅकमध्ये विकण्याचं प्रमाण वाढलं आहे. यावर आळा घालण्यासाठी सरकारने महत्त्वाचं पाऊल उचलले आहे.
दिलासादायक! पुणे बाजार समितीमध्ये मटारला मिळाला तब्बल 15 हजारांचा कमाल भाव
लवकरच, मोबाईल हँडसेट (Mobile handset) कंपन्यांना भारतात मोबाईल विकण्यापूर्वी किंवा आयात करण्यापूर्वी त्यांचा IMEI क्रमांक सरकारच्या पोर्टलवर नोंदवावा लागणार आहे. याच्या मदतीने हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल सहज ब्लॉक (block) करता येऊ शकणार आहे. या निर्णयामुळे तुमची वैयक्तिक माहिती लिक होणार नाही.
फक्त 999 रुपयांमध्ये इलेक्ट्रिक बाइक करा खरेदी; नवीन 'URBN' इ-बाइक लॉन्च
आयएमईआयच्या (IME) माध्यमातून गुन्ह्यातील गुन्हेगारांचा माग काढणे सरकारला सहज शक्य होणार आहे. विशेष म्हणजे सरकारच्या माहितीशिवाय मोबाइल आयात करणे शक्य होणार नाही आणि सरकारच्या कर संकलनातही वाढ होईल. सरकारची अधिसूचना 1 जानेवारी 2023 पासून लागू होणार असून, याचा ग्राहकांना मोठा फायदा होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांनो बाधित जनावरांवर त्वरित उपचार करून घ्या; अमरावती जिल्ह्यासाठी 2 लाख 60 हजार लसी उपलब्ध
पोस्ट ऑफिसच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतून वृद्धांना मिळणार लाखों रुपये; घ्या आजच लाभ
रब्बी हंगामातील कडधान्यांचे उत्पादन वाढणार; सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय
Published on: 29 September 2022, 04:25 IST