Automobile

सध्या पेट्रोल डिझेलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढलेत. यामुळे सध्या गाड्या चालवणे परवडत नाही. असे असताना आता आपण एखादे दुचाकी अथवा चारचाकी वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर थोडे थांबा. कारण एका वर्षात इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती (Electric Vehicle) पेट्रोल कारच्या किमतीएवढ्या होतील, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

Updated on 18 June, 2022 4:49 PM IST

सगळ्यांचे स्वप्न असते की, आपली स्वतःची कार बाइक असावी, मात्र ते सगळ्यांनाच शक्य होत नाही. सध्या पेट्रोल डिझेलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढलेत. यामुळे सध्या गाड्या चालवणे परवडत नाही. असे असताना आता आपण एखादे दुचाकी अथवा चारचाकी वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर थोडे थांबा. कारण एका वर्षात इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती (Electric Vehicle) पेट्रोल कारच्या किमतीएवढ्या होतील, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

नितीन गडकरी म्हणाले, पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून मोदी सरकार पिकांच्या अवशेषांपासून इथेनॉल तयार करण्यावर भर देत आहे. यामुळे आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचे दरही कमी होतील. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल. एका वर्षाच्या आत देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमत पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांच्या बरोबरीत याव्यात, असा प्रयत्न आहे. यामुळे जीवाश्म इंधन, पेट्रोल, डिझेल इत्यादींवर होणारा खर्च कमी होईल, असेही ते म्हणाले.

आपण सध्याचे चित्र बघितले तर बॅटरीच्या किमतीमुळे इलेक्ट्रिक वाहने महाग आहेत. कार कारच्या किमतीत 35 ते 40 टक्के एवढा खर्च बॅटरीवरच होतो. यामुळे वाहनाच्या किमती देखील जास्त आहेत. यामुळे सध्या त्या सगळ्यांना खरेदी करणे परवडत नाही. गडकरी यांनी अनेक नियम आणले आहेत. यामध्ये जर एखाद्या व्यक्तीने रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने उभ्या केलेल्या वाहनाचा फोटो काढून पाठवला, तर त्या व्यक्तीला 500 रुपये बक्षीस दिले जाईल, असेही ते म्हणाले.

घोडगंगाचा कोजन, डिस्टलरी प्रकल्प आला नफ्यात, शेतकऱ्यांना होणार फायदा

दरम्यान, पुढील काळात इलेक्ट्रीक गाड्या कमी किमतीत उपलब्ध झाल्या तर पेट्रोल आणि डिझेलची गरज कमी होईल, आणि प्रदूषणासह अनेक प्रश्न त्याठिकाणी मिटणार आहेत. यामुळे आता याकडे सर्वसामान्य लोकांचे लक्ष लागले आहे. अनेकांना इलेक्ट्रिक गाड्या घ्यायच्या आहेत, मात्र सध्या त्यांची किंमत खूपच जास्त आहे.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनी आपल्या शेतकरी नेत्याला दिली नवी कोरी फॉर्च्युनर भेट, राजू शेट्टींवर शेतकऱ्यांचे प्रेम अजूनही कायम
एकदा चार्ज केल्यावर 7 महिने चालणार ही कार, जाणून घ्या..
काय सांगता! आता आठवड्यात फक्त 4 दिवस काम, 3 दिवस सुट्टी, लागु होणार नवा नियम

English Summary: Diwali for car-bike riders! Nitin Gadkari's big announcement
Published on: 18 June 2022, 04:02 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)