केंद्र सरकार व राज्य सरकार सर्वसामान्य लोकांसाठी नवनवीन योजना राबवत असतं. आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महत्वाची घोषणा केली आहे. ही घोषणा बाइक खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले, येणाऱ्या काही दिवसात इलेक्ट्रिक वाहनांची किंमत पेट्रोल वाहनांच्या बरोबरीने असेल. यांच्या या वक्तव्यानंतर कार आणि दुचाकीस्वार चांगलेच खूश झाले आहेत.
शेतकरी आता थेट विमानाने पाठवणार शेतमाल; 'ही' योजना ठरणार शेतकऱ्यांसाठी फायदेशीर
इलेक्ट्रिक इंधन लवकरच प्रत्यक्षात येईल
नितीन गडकरी म्हणाले की, "तंत्रज्ञानात झपाट्याने होणारा बदल आणि हरित इंधन यामुळे इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल्सची किंमत कमी होईल. यामुळे पुढील एका वर्षात इलेक्ट्रिक वाहनांची किंमत पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांच्या बरोबरीने होईल. प्रभावी स्वदेशी इंधनाकडे जाण्याच्या गरजेवर भर देऊन गडकरींनी आशा व्यक्त केली की लवकरच इलेक्ट्रिक इंधन प्रत्यक्षात येईल.
त्यामुळे प्रदूषणाची पातळी कमी होईल. देशातील खासदारांनी हायड्रोजन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, तसेच त्यांनी आपापल्या लोकसभा मतदारसंघात सांडपाण्याच्या पाण्यापासून ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी पुढाकार घेण्यास सांगितले. हायड्रोजन हा लवकरच सर्वात स्वस्त इंधनाचा पर्याय असेल, असेही यावेळी ते म्हणाले.
EPF Investment: पीएफचे पैसे तुम्हाला करोडपती बनवतील; कसे ते पहा...
पेट्रोल वाहनांच्या बरोबरीची किंमत असेल
लिथियम आयन बॅटरीच्या किमती झपाट्याने कमी होत आहेत. झिंक-आयन, अॅल्युमिनियम-आयन, सोडियम-आयन बॅटरी विकसित केल्या जात आहेत. तो दिवस दूर नाही जेव्हा इलेक्ट्रिक स्कूटर, कार, ऑटो रिक्षाची किंमत पेट्रोलवर चालणारी स्कूटर, कार, ऑटो रिक्षाच्या बरोबरीची होईल. तसेच इलेक्ट्रिक वाहनाचा फायदा सांगताना ते म्हणाले, जर तुम्ही पेट्रोलवर 100 रुपये खर्च करत असाल तर इलेक्ट्रिक वाहन चालवताना हा खर्च 10 रुपयांपर्यंत खाली येईल, असेही ते म्हणाले.
Edible Oil Price Cut : खुशखबर ! खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी घसरण ! इतक्या रुपयांनी उतरल्या किंमती
Published on: 19 July 2022, 02:13 IST