Automobile

सर्वसामान्य लोकांना पेट्रोलच्या किमती परवडत नाहीत. त्यामुळे कित्येकजण इलेक्ट्रिक वाहनाकडे वळत आहेत. बाजारात विविध कंपन्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकी येत आहेत.आता एका कंपनीने एक भन्नाट बाइक बाजारात आणली आहे.

Updated on 29 September, 2022 12:14 PM IST

सर्वसामान्य लोकांना पेट्रोलच्या किमती परवडत नाहीत. त्यामुळे कित्येकजण इलेक्ट्रिक वाहनाकडे (Electric vehicle) वळत आहेत. बाजारात विविध कंपन्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकी येत आहेत.आता एका कंपनीने एक भन्नाट बाइक बाजारात आणली आहे.

दोन दिवसापूर्वी म्हणजेच 27 सप्टेंबर रोजी इलेक्ट्रिक (Electric) मोबिलिटी ब्रँड Motovolt ने आपली नवी ई-बाइक लॉन्च केली आहे. या बाइकला URBN e-bike असे नाव देण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे ही इलेक्ट्रिक बाइक केवळ 999 रुपयांत बुक करता येऊ शकणार आहे.

शेतकऱ्यांनो रब्बीत कमी खर्चात पिकांचे उत्पादन दुप्पट करा; फक्त 'या' टिप्स कराव्या लागतील फॉलो

URBN e-bike ची वैशिष्ट्ये 

ही इलेक्ट्रिक बाइक फुल चार्ज झाल्यानंतर तब्बल 120KM ची रेंज देते. कंपनीने या बाइकची किंमत केवळ 49,999 रुपये एवढी ठेवली आहे. ही बाइक मोटोव्होल्ट कंपनीच्या वेबसाइटवर आणि 100+ फिजिकल रिटेल पॉइंट्सवर 999/- रुपयांत बुक केली जाऊ शकते.

ही बाइक आपण ईएमआयवरही खरेदी करू शकता. महत्वाचे म्हणजे ही बाइक चालविण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारच्या लायसन्सची (license) अथवा रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही.

कीटकनाशकांच्या फवारणीसाठी वापरा 'हे' अफलातून जुगाड; पैशांची होणार बचत

Motovolt URBN मध्ये एक रिमूव्हएबल BIS-अप्रुव्ड बॅटरी आहे. हिला पेडल असिस्ट सेंसर देखील आहे. या बॅटरीमध्ये पेडल अथवा ऑटोमॅटिक मोडसह अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. या ई-बाइकची बॅटरी पूर्णपणे चार्ज झाल्यानंतर, तब्बल 120KM पर्यंत रेंज देते, असा दावाही कंपनीने केला आहे.

या बाइकमध्ये इग्निशनचे स्विच, हँडल लॉक, रिअर आणि फ्रंट डिस्क ब्रेक, तसेच हाइड्रॉलिक रिअर शॉकर देण्यात आले आहे. URBN ई-बाइक एक स्मार्ट ई-सायकल आहे. जी एका इंटिग्रेटेड स्मार्ट फोन अॅपसह येते. हीचे वजन केवळ 40 किलो ग्रॅम एवढे आहे. तसेच हिची टॉप स्पीड 25 kmph एवढी आहे. हीची बॅटरी 4 तासांमध्ये पूर्ण होते. 

महत्वाच्या बातम्या 
दिलासादायक! पुणे बाजार समितीमध्ये मटारला मिळाला तब्बल 15 हजारांचा कमाल भाव
शेतमाल वाहतुकीसाठी शेतकऱ्यांना मिळणार 75 टक्के अनुदान; आजच करा अर्ज
धनु आणि मकर राशींना होणार धनलाभ; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

English Summary: Buy electric bike just Rs 999 URBN e-bike launched
Published on: 29 September 2022, 12:14 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)