भारत सरकारने आता BS6 पेट्रोल आणि डिझेल वाहनांमध्ये CNG आणि LPG किटच्या रेट्रो फिटमेंटला मान्यता दिली आहे. आत्तापर्यंत हे किट फक्त बीएस-4 वाहनांमध्येच बसवले जाऊ शकत होते. त्याचा मसुदा प्रस्ताव रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जानेवारी 2022 मध्ये जारी केला होता, जो आता अधिसूचित केला जात आहे. याचा अर्थ असा की तुम्ही आता तुमच्या सध्याच्या पेट्रोल वाहनांना सीएनजी किंवा एलपीजीवर चालवण्यासाठी रिट्रोफिट करू शकता.
याशिवाय ३.५ टनांपर्यंतच्या डिझेल वाहनांमध्येही ही सुविधा सुरू झाली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचनेत म्हटले आहे की, "मंत्रालयाने BS-VI पेट्रोल वाहनांमध्ये CNAG आणि LPG किट स्थापित करण्यासाठी आणि 3.5 टनापेक्षा कमी वजनाचे डिझेल इंजिन CNG/LPG इंजिनांसह बदलण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे.
मंत्रालयाने, तुमच्या वाहनाच्या 'रेट्रोफिटमेंट'साठी अद्याप मंजुरी आवश्यक आहे. पेट्रोल आणि डिझेल इंजिनच्या तुलनेत CNG हे अधिक किफायतशीर आणि पर्यावरणपूरक इंधन आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत त्याची किंमत झपाट्याने वाढली आहे. सीएनजीच्या किमतींवर प्रचलित आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम झाला आहे.
ऊसाच्या एफआरपीची रक्कम न दिल्याने हर्षवर्धन पाटलांच्या साखर कारखान्याच्या कार्यालयाची तोडफोड
सध्या मुंबई आणि आसपासच्या भागात सीएनजीची किरकोळ विक्री 80 रुपये प्रति किलो आणि दिल्लीत 75.61 रुपये प्रति किलो आहे. काही ठिकाणी याचे दर मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. मात्र पेट्रोल डिझेलच्या तुलनेत हे फायदेशीर आहे. यामुळे याबाबत मागणी केली जात होती.
महत्वाच्या बातम्या;
'शहाजीबापू पाटील यांच्यामुळे त्यांच्या भावावर गळफास लावून आत्महत्या करण्याची वेळ आली'
Milk FRP; दुधाला एफआरपी लागू करण्यासाठी किसान सभा होणार आक्रमक, घेतला मोठा निर्णय
देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतोय, आणि विद्यार्थी लटकून नदी पार करत आहेत
Published on: 23 August 2022, 03:32 IST