बाईक म्हटले म्हणजे अनेक कंपन्यांचे अनेक वेगवेगळी मॉडेल्स बाजारात आहे. परंतु शेतकरी बंधूंच्या दृष्टीने विचार केला तर सगळ्यात आगोदर शेतकर्यांची आवडती होती स्प्लेंडर व तिच्या मध्ये आलेले वेगवेगळे व्हेरीयन्ट आणि बजाजचा विचार केला तर बजाज मध्ये सिटी 100 बाईक देखील शेतकऱ्यांची खूप आवडती होती आणि त्याच्यानंतर बजाज पल्सर या बाईकचा देखील समावेश होतो.
नक्की वाचा:आता होणार राडा! रॉयल एनफिल्ड इलेक्ट्रिक बाईक मार्केटमध्ये येणार..
परंतु आता याच बजाज सिटी बाईकची इंजिन पावर वाढवून बजाज ऑटोने आता ती 125cc करून लॉन्च केली आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भारतातील बजाज सिटी 125X सर्वात स्वस्त 125 सीसी बाईक आहे.बजाजची ही बाईक होंडा शाईन आणि हिरो स्प्लेंडर सुपर स्प्लेंडर यांच्यासोबत स्पर्धा करण्यास सक्षम आहे.
या बाईकची वैशिष्ट्ये
विशेष म्हणजे ही तीन पर्यायांमध्ये उपलब्ध केली असून रेड डेकल्ससह एबोनी ब्लॅक, ब्लू डेकल्ससह एबोनी ब्लॅक आणि ग्रीन डेकल्ससह एबोनी ब्लॅक अशा तीन रंगात उपलब्ध आहे.
नक्की वाचा:खरं काय! फक्त 8 हजारात Bajaj CT 110 घरी आणता येणार, ऑफर जाणून घ्या
या बाईकला पावर साठी प्रवासी मोटर सायकल 124.4 सीसी एअर कुल्ड इंजन वापरते जे 10.9PS आणि 11NM टॉर्क देते. ही 5 स्पीड गिअरबॉक्ससह येते. बाईकमध्ये ट्रेकिंगसाठी 130 मीमी फ्रंट आणि रियर ड्रम ब्रेक उपलब्ध आहे. खालच्या व्हेरिएंटवर उपलब्ध आहेत.
या बाईकला 80/100-17 फ्रंट आणि 100/90-17 मागील ट्यूबलेस टायर 17 इंच अल्लोय व्हीलवर चालते. तसेच या बाईकला एक यूएसबी चार्जिंग पोर्ट आणि काऊलवर एक एलइडी डीआरएल मिळतो.
या बाईकचा गोल हेडलॅम्प, एलईडी डीआरएल, रबर टॅंक पॅड, क्रॅश गार्ड,फोर्क गेटर्स आणि मोठी ग्रेब रेल यासारखी वैशिष्ट्ये आहेत.
या बाईकची किंमत
या बाईकची किंमत 71 हजार 345 रुपये असणार आहे.
Published on: 27 August 2022, 07:07 IST