सध्या रोडवरील अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. यामुळे अनेकांचे जीव देखील रोज जात आहेत. यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. तसेच सुरक्षित कार खरेदी कराव्यात. असे असताना आता लोकसभेत भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी कारमधील एअरबॅगबाबत प्रश्न विचारला.
या प्रश्नाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर देताना सरकार या प्रस्तावावर विचार करत असल्याचे सांगितले. यावेळी गडकरी म्हणाले, सध्या कारच्या पुढच्या सीटच्या प्रवाशांसाठी एअरबॅग्ज अनिवार्य आहेत. आता सरकार मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांसाठी एअरबॅग अनिवार्य करणार आहे.
यामुळे आता देशातील रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकार मोठा निर्णय घेणार आहे. लवकरच प्रत्येक कारमध्ये किमान 6 एअरबॅग अनिवार्य करण्यात येणार आहे. या महिन्यातच याबाबत निर्णय होणार आहे.
शेतकऱ्यांनो आता पीव्हीसी पाईपसाठी मिळणार ३० हजार रुपये, असा घ्या लाभ..
गडकरी म्हणाले की, 6 एअरबॅगच्या प्रस्तावावर विचार करत असल्याचे सांगितले. लवकरच त्याची अंमलबजावणी होईल. तसेच एअरबॅगच्या किमतीवर देखील यावेळी चर्चा झाली. यावेळी एका एअरबॅगची किंमत फक्त 800 रुपये असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र आपल्याकडून भरमसाठ पैसे का आकारले जातात, असा प्रश्न देखील विचारला जात आहे. यावर कंपनी 15 हजार रुपये का आकारत आहे. गडकरी म्हणाले, एका एअर बॅगची किंमत 800 रुपये आणि 4 एअरबॅगची किंमत 3200 रुपये आहे. यासोबत काही सेन्सर्स आणि सपोर्टिंग ऍक्सेसरीज बसवल्यास एअरबॅगची किंमत 500 रुपयांपर्यंत वाढू शकते.
तुम्ही फक्त 'येस सर' म्हणायचं आणि ... ! गडकरींनी अधिकाऱ्यांना झाप झाप झापलं
यामुळे किंमत 1300 रुपये असू शकते. यामुळे 4 एअरबॅगची किंमत 5200 रुपये होते. असे असले तरी कंपनी त्याची किंमत 60 हजार रुपये सांगते. प्रत्यक्षात मात्र आपल्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे आकारले जातात. यामुळे अनेकदा लोकांकडून याकडे लक्ष दिले जात नाही आणि याबाबत अपघात घडतात. यामुळे अनेकांचे अपघातात मृत्यू होतात.
महत्वाच्या बातम्या;
एकाच पिकात चार पिके, नवीन तंत्रज्ञानामुळे मिळणार बक्कळ पैसा..
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! लंम्पी त्वचेच्या रोगावर लस आली
टाटाची सर्वात स्वस्त CNG कार लॉन्च, मायलेजमुळे संपणार महागड्या पेट्रोलचे टेन्शन, जाणून घ्या..
Published on: 12 August 2022, 03:21 IST