गोकुळकडून दूध उत्पादकांना जुन्याच पद्धतीने चिठ्ठया देऊन कारभार केला जातो. यामुळे दूध उत्पादकांना याचा मोठा फटका बसतो. यामुळे सगळीकडे आता ऑनलाइन पद्धतीचा वापर केला जात असताना गोकुळ का अशा कारभार करत आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे.
मागच्या अनेक वर्षांत गोकुळकडून अनेक बदल करण्यात आले. परंतु दुधाची माहिती मात्र वर्षानुवर्षे चिठ्ठीद्वारे दिली जाते. यामुळे याचा फटका हा थेट शेतकऱ्यांना बसतो.
गोकुळकडून सध्या सॅटेलाईट डेअरी, कोअर नेटवर्क, सिक्स लेयर पॅकिंग असे अनेक प्रयोग राबवले जातात. चिठ्ठीवरील आकडे गायब झाल्यानंतर उत्पादकांना बिल घेताना गोंधळाची स्थिती निर्माण होते.
साखरेचे भाव वाढण्याचा अंदाज, कारण..
गोकुळच्या स्पर्धक दूध संघांनी अशा गोष्टींचा वापर केल्याने अनेक गोष्टी त्यांना सोप्या जात आहेत. यामध्ये अमूल चितळेचा समावेश आहे. गोकुळने अनेक गोष्टीत बदल केले परंतु नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून मेसेज सुविधा अद्यापही सुरू केली नाही.
जर अशी सुवीधा दूध उत्पादकांना दिल्यास याचे चांगल्या पद्धतीने स्वागत होईल. तसेच अनेक गोष्टी सोप्या देखील होणार आहेत. सध्या १४ लाख लिटर दुधाचे संकलन गोकुळकडून होत आहे.
राज्यात मोठा दुष्काळ पडणार? मागील वर्षीच्या तुलनेत ५० टक्के कमी पाऊस
असे असताना मात्र, एवढा मोठा दूध संघ असूनही, दूध उत्पादकांना दररोजच्या दुधाची माहिती चिठ्ठीद्वारे दिली जात असल्याची खंत व्यक्त होत आहे. यामुळे शेतकरी याबाबत मागणी करत आहेत.
तुमच्या बागेत ही पाच झाडे लावा, तुमच्या घराची हवा पूर्णपणे करतील स्वच्छ
३५ हजारांची लाच मागणारा ग्रामसेवक अटकेत, 6 लाखांचे बिल काढण्यासाठी केली होती पैशांची मागणी...
कोंबड्या आणि शेळीसाठीही कर्ज मिळणार, अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या
Published on: 13 July 2023, 12:05 IST