सध्या गेल्या काही दिवसांपासून दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. राज्य सरकारने शासन निर्णय काढून गाईच्या दुधाला ३४ रुपये प्रति लिटर खासगी आणि सहकारी दूध संस्थांनी दर देण्याची जाहीर केले, असे असले तरी परिस्थिती मात्र वेगळीच आहे.
शिवाय खाद्याचे दरही कमी करण्याची सूचना केली होती. प्रत्यक्षात असे घडताना दिसत नसल्याची माहिती दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिली. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
महिनाभरापूर्वी खाद्याचे दर २८०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल होते. आता हे दर ३२०० ते ३४०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. तसेच लांबलेल्या व खंड पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना चाऱ्याच संकटही भेडसावते आहे. यामुळे आता चारा देखील विकत आणावा लागत आहे.
राज्यात अनेक ठिकाणी ४५०० रुपये प्रति टनाप्रमाणे ऊस खरेदी करून त्यावर एक हजार रुपये वाहतूक खर्च करीत तो वैरण म्हणून घरी आणावा लागत आहे. यामुळे हा व्यवसाय करणे अवघड झाले आहे.
दरम्यान, चार गाईंना किमान दिवसाला चार ऊस पाचटाच्या मुळ्या ज्याची किंमत ६०० रुपये व खाद्य किमान २०० रुपये असा ८०० रुपये खर्च होतो आहे. दुसरीकडे जी गाय २० लिटर दूध देत होती ती आता १५ लिटरवर आली आहे.
इथल्या दूधाला भाव देत नाही अन् बाहेरुन आयात का करता ? सुप्रिया सुळेंचा मोदी सरकारवर बरसल्या...
साधारणतः दोन महिन्यांपूर्वी चांगल्या दुधाला ४० ते ४२ रुपये प्रति लिटरपर्यंत दर मिळत होता. मात्र आता हाच दर 32 रुपयांपेक्षा कमी आला आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.
Published on: 10 August 2023, 08:22 IST