Animal Husbandry

शेतीव्यतिरिक्त पशुपालन हा देखील भारतातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा व्यवसाय बनला आहे.आज-काल पशु पालनाचा व्यवसाय भारतातच नाही तर परदेशातही पोहोचला आहे.कारण जनावरांकडून दूध मिळते आणि दुधाची मागणी कधीच कमी होत नाही.

Updated on 16 June, 2022 2:00 PM IST

शेतीव्यतिरिक्त पशुपालन हा देखील भारतातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा व्यवसाय बनला आहे.आज-काल पशु पालनाचा व्यवसाय भारतातच नाही तर परदेशातही पोहोचला आहे.कारण जनावरांकडून दूध मिळते आणि दुधाची मागणी कधीच कमी होत नाही.

मात्र यादरम्यान पशुपालक शेतकऱ्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न असतो की त्यांना त्यांच्या जनावरांपासून जास्तीत जास्त दूध उत्पादन कसे मिळवायचे.अशा परिस्थितीत या लेखात तुम्हाला अशाच काही गवतात बद्दल सांगणार आहोत,जे जनावरांना चारा म्हणून खाल्ल्याने तुम्ही त्यांच्याकडून अधिक प्रमाणात दूध मिळवू शकता.

कारण सर्वसाधारणपणे असे दिसून येते की शेतकरी मका, ज्वारी, बाजरी इत्यादी प्रकारच्या कोरडा चारा खायला देतात.अनेक वेळा कोरडा चारा खाऊन जनावरे जास्त काळ दूध देऊ शकत नाहीत.त्यामुळे अशा परिस्थितीत आज तुम्हाला गवताच्या काही महत्त्वाच्या जाती बद्दल सांगणार आहोत जे प्राण्यांना खायला दिले जातात.

नक्की वाचा:शेतकऱ्यांनो शेळीपालनातून लाखोंची कमाई करा, कर्ज आणि सबसिडी जाणून घ्या

गुरांना चारा म्हणून उपयुक्त अशा या गवताच्या 3 जाति

1-1- बरसिम गवत- यामध्ये पहिले नाव बरसीम गवताचे घ्यावे लागेल. हे गवत प्राण्यासाठी सर्वोत्तम आणि पौष्टिक मानले जाते. त्यात कॅल्शियम आणि फॉस्फरस पुरेशा प्रमाणात आढळतात.  त्याचबरोबर प्राणीदेखील हे स्वादिष्ट गवत मोठ्या आवडीने खातात.तसेच त्यामुळे जनावरांची पचन क्रिया व्यवस्थित राहते.

नक्की वाचा:पंजाबच्या गाई जास्त दूध देतात आणि आपल्या का कमी देतात, शेतकऱ्यांनो वाचा कारणे

2- जिरका गवत- यामध्ये दुसरे नाव जिरका गवताचे घ्यावे लागेल.  या गवताची पेरणी देखील सोपी आहे कारण बारसिम गवताच्या तुलनेत याला कमी सिंचनाची आवश्‍यकता असते.

या गवताच्या लागवडीचा प्रगत काळ हा ऑक्टोबर ते नोव्हेंबर हा असतो.

3- नेपियर गवत-नेपियर गवत उसासारखे दिसते.दुभत्या जनावरांसाठी हे अन्न म्हणून अतिशय पौष्टिक मानले जाते. त्याचे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गवताच्या लागवडीनंतर हे फार कमी दिवसात कापणी वर येते.

याचा कापणीचा कालावधी कमीत कमी पन्नास दिवसाचा आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना त्यांच्या गुरांसाठी लवकर पौष्टिक चारा उपलब्ध होतो.

नक्की वाचा:Nutrilop ब्रँड आहे चारा पिकांसाठी उत्तम, शेतकऱ्यांना मिळेल दुप्पट नफा

English Summary: thise three types of grass for animal fodder thats give result to growth milk production
Published on: 16 June 2022, 02:00 IST