Animal Husbandry

मत्स्यपालन सुरू करण्यापूर्वी पूर्वतयारी करणे खूप महत्त्वाचे असते. कारण पूर्वतयारीनियोजनात्मक असली तरपुढील गोष्टी अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने साधता येतात.

Updated on 04 May, 2022 3:24 PM IST

 मत्स्यपालन सुरू करण्यापूर्वी पूर्वतयारी करणे खूप महत्त्वाचे असते. कारण पूर्वतयारीनियोजनात्मक असली तरपुढील गोष्टी अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने साधता येतात.

.मत्स्यपालन यामध्ये पूर्व तयारी केल्याने माशांचे भरघोस उत्पादनाची हमी मिळते. या लेखामध्ये आपण मत्स्यपालन सुरू करण्यापूर्वीत्यासाठीची पूर्वतयारी कशी करावी याबद्दल जाणून घेऊ.

 तलाव कोरडे करणे

1- मत्स्यसंवर्धन ज्या तलावांमध्ये करायचे आहे त्या तलावांमधील पाणी हे वॉटर ड्रेनेज पाईप किंवा पंपाच्या साह्याने काढून टाकावे. जेणेकरून कीटक, बेडूक,  जंगली मासे इत्यादी बाहेर निघून जातील.

2- तलावाला भेगा पडेपर्यंत तलाव कोरडा करणे महत्वाचे आहे.

 तलावाचे नांगरणी

1-मत्स्यसंवर्धन तलावाच्या नांगरणीची आवश्यकता असते.

2- नांगर जवळपास तीन ते चार इंच खोल जाईल अशा पद्धतीने नांगरणी करावी.

3- त्यामुळे मातीचे थर वर खाली होऊन हानिकारक वायू निघून जाण्यास मदत होते. आतल्या भागातील पोषक घटक वरील भागात येतात.

 तलावामध्ये पाणी भरणे

1-पाण्याच्या पाइपच्या तोंडाला लहान आकाराच्या छिद्राची जाळी लावावी.त्यामुळे पाण्यामध्ये मत्स्यबीज भक्षक कीटक, मासे येणार नाहीत.

2- तलाव दोन ते अडीच मीटर खोलीचा असेल तर 1.25 ते दीड मिटर च्या जवळपास पाणी भरावे.

 पाणवनस्पतींचे निर्मूलन

 पाणवनस्पती मासळीच्या वाढीसाठी आवश्यक घटकांचा वापर स्वतःच्या वाढीसाठी करतात. त्यामुळे पाण्याचा पृष्ठभाग झाकला जातो. पाण्यातील ऑक्सिजन ची मात्रा कमी होऊन मासे मरू शकतात.

     पारंपारिक पद्धतीने निर्मूलन

1- वनस्पती हाताने उपटून काढणे.

2- तरंगणाऱ्या वनस्पती जाळ्यांनी काढणे.

3- तलावाच्या काठावर गुरांना चरण्यासाठी सोडने.

  पान वनस्पती निर्मुलनाची यांत्रिक पद्धत

गवत कटर चा वापर - जैविक

1- यामध्ये पाणवनस्पती खाणारे मासे तलावात सोडले जातात.

2- गवत्या मासा, गोरामी, सिल्वर बार्ब, सिप्रनस कधी मासे त्यांच्या वजनाचे चारपट गवत खातात

 मत्स्यबीज भक्षक माशांचे निर्मूलन

 सुकलेल्या तलावात किंवा तलावात पाणी भरतांना जाळी चा वापर केल्यास मत्स्यबीज भक्षक मासे आढळत नाहीत.

   निर्मूलन पद्धत

1- चार ते पाच वेळा लहान छिद्रचे जाळे तलावात फिरवून  मासे काढावे.

2-हेक्‍टरी 300 किलो ब्लिचिंग पावडर पाण्यामध्ये टाका. पंधरा ते वीस मिनिटात मासे मरतात. अकरा दिवसांपर्यंत हा परिणाम होतो तो कमी करण्यासाठी बारा ते चौदा तासानंतर तीनशे पन्नास किलो युरिया प्रति हेक्‍टर या प्रमाणात पाण्यामध्ये टाकावा.

3- मोहाच्या तेलाची पेंड 2000 ते 2500 किलो प्रति हेक्‍टर वापरावी परिणाम तीन आठवडे दाखवा

 खतांचा वापर

1- शेंगदाणा किंवा मोहरीचे पेंड 750 किलो, शेणखत दोनशे किलो व सिंगल सुपर फॉस्फेट 50 किलो प्रति हेक्‍टर  पातळ मिश्रण मत्स्यबीज संचयन याच्या तीन दिवस आधी तयार करावे. तलावात सर्व ठिकाणी पसरावे त्यामुळे प्लवंग निर्मिती जलद गतीने होते किंवा

 

2- मत्स्यबीज सोडण्याच्या 15 दिवस आधी हेक्‍टरी दहा टन शेणखत तलावांमध्ये टाकावे. वनस्पती प्लवंग चार ते पाच दिवसात आणि प्राणी प्लवंग सात ते आठ दिवसात तयार होतात.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:वैरण अनुदान! वैरणीसाठी शेवगा लागवड करणे या योजनेसाठी मिळणार प्रति हेक्टरी 30 हजार रुपये अनुदान

नक्की वाचा:पाच वर्षात नव्हे एवढा भाव! घरातील अत्यावश्यक जिऱ्याचे भाव गगनाला, ही आहेत त्यामागील प्रमुख कारणे

नक्की वाचा:खंडपीठात सुनावणी:हंगामाच्या शेवटी 40 टक्के ऊस शिल्लक, केंद्र आणि राज्य सरकारला शपथपत्र दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

English Summary: thise is pre planing is so important in pond fishery that give more production
Published on: 04 May 2022, 03:24 IST