पशुपालन व्यवसायाची सगळी मदार ही दूध उत्पादनावर अवलंबून आहे. वाढीव दुध उत्पादन म्हणजेच आर्थिक उत्पन्न वाढवण्याचा एक समृद्ध मार्ग असतो. परंतु वाढीव दूध उत्पादनासाठी जनावरांचे व्यवस्थापन प्रत्येक दृष्टिकोनातून व्यवस्थित करणे देखील तेवढेच गरजेचे आहे. आपल्याला माहित आहेच की, पशुपालनामध्ये पशुंचे आहार व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थापन तसेच त्यांचे पाण्याचे व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे.
परंतु आपण वाढीव दूधउत्पादनाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आहार व्यवस्थापन उत्तम ठेवणे खूप गरजेचे आहे. आपण जो काही जनावरांना आहार देतो तो पौष्टिक घटकांनी समृद्ध असणे तेवढेच गरजेचे आहे. या लेखात आपण जनावरांच्या दूध उत्पादन वाढीत महत्त्वपूर्ण ठरू शकणाऱ्या काही गवताबद्दल म्हणजे चाऱ्याबद्दल माहिती घेऊ.
नक्की वाचा:शेतकरी मित्रांनो जनावरांचे पालन 'अशा' पद्धतीने करा; अनेक आजारांपासून राहतील दूर
गुरांना दूध उत्पादन वाढीसाठी उपयुक्त गवताच्या तीन जाती
1- जीरका गवत- जिरका गवत खूप महत्त्वाचे गवत असून या गवताची लागवड देखील खूप सोपी आहे. जर आपण बरसीम गवताच्या तुलनेत विचार केला तर याला कमी पाण्याची आवश्यकता असते. गवत जनावरांसाठी उपयुक्त असून त्याचा लागवडीचा काळ हा ऑक्टोबर ते नोव्हेंबर हा असतो.
नक्की वाचा:शेतकरी मित्रांनो 'या' गाईचे करा पालन; दिवसाला देते 12 लिटरपेक्षा जास्त दूध
2- बरसिम गवत- बरसिम गवत हे जनावरांसाठी सर्वोत्तम आणि पौष्टिक असा आहार आहे.या गवतामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मोठ्या प्रमाणात आढळते. त्यासोबतच जनावरे देखील हे स्वादिष्ट गवत मोठ्या आवडीने खातात व जनावरांचे पचन क्रिया देखील यामुळे व्यवस्थित राहते.
3- नेपियर गवत- हे गवत उसासारखे दिसते. दुधाळ जनावरांसाठी हे गवत अतिशय पौष्टिक मानले जाते. हे गवत लागवड केल्यानंतर खूप कमी दिवसात कापणीवर येते. या गवताचा कापणीचा कालावधी कमीत कमी 50 दिवसांचा असून शेतकरी बांधवांना गुरांसाठी लवकर पौष्टिक चारा उपलब्ध होतो.
नक्की वाचा:शेतकऱ्यांनो अधिक दुग्धोत्पादनासाठी असा करा मुरघास तयार, जाणून घ्या...
Published on: 16 September 2022, 01:36 IST