Animal Husbandry

सध्या शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसायासोबत कुक्कुटपालन व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात केला जात आहे.सध्या पोल्ट्री उद्योग-व्यवसायिक दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात केला जात आहे. सध्या पोल्ट्री व्यवसायात कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग ही संकल्पना खूप मोठ्या प्रमाणात पुढे आले असून या माध्यमातून ब्रॉयलर कोंबड्यांचे पालन मोठ्या प्रमाणात होत आहे.

Updated on 29 September, 2022 10:47 AM IST

सध्या शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसायासोबत कुक्कुटपालन व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात केला जात आहे.सध्या पोल्ट्री उद्योग-व्यवसायिक दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात केला जात आहे. सध्या पोल्ट्री व्यवसायात कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग ही संकल्पना खूप मोठ्या प्रमाणात पुढे आले असून या माध्यमातून ब्रॉयलर कोंबड्यांचे पालन मोठ्या प्रमाणात होत आहे.

परंतु बरेच शेतकरी स्वतः सगळ्या प्रकारचा खर्च करून  विविध प्रकारच्या गावरान कोंबड्यांचे देखील पालन करत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण या लेखात  कुक्कुटपालन व्यवसायात चांगला नफा देणाऱ्या काही गावरान कोंबड्यांच्या प्रजाती विषयी माहिती घेऊ.

नक्की वाचा:Poutry: पोल्ट्री व्यवसायात धनाची बरसात करेल 'प्रतापधन',वाचा सविस्तर माहिती

 पोल्ट्री व्यवसायात महत्त्वाच्या गावरान कोंबड्यांच्या जाती

1- देहलम रेड कोंबडी- या जातीच्या कोंबड्या एका वर्षाला दोनशे ते दोनशे वीस अंडी देतात.

2- गिरीराज कोंबडी- गिरीराज कोंबडीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे दोन महिन्यात एक किलो इतक्या वजनाच्या होत असतात.

मांस विक्रीसाठी गिरीराज कोंबडी खूप फायदेशीर आहे. जर आपण गिरीराज कोंबडीचे अंडे उत्पादनाचा विचार केला तर या जातीच्या कोंबड्या थोड्या इतर जातींपेक्षा महागडा ठरतात कारण या जातीच्या कोंबड्या एकाचक्रा दीडशे अंडी देत असतात.

3- वनराज- या जातीच्या कोंबड्या दोन महिन्यात एक किलो वजनाच्या होतात अंडी मात्र इतर जातींपेक्षा कमी देतात. एका चक्रात 120 ते 160 अंडी देतात.

नक्की वाचा:शेतकरी मित्रांनो जनावरांचे पालन 'अशा' पद्धतीने करा; अनेक आजारांपासून राहतील दूर

4- कडकनाथ- ही जात सर्वाधिक प्रसिद्ध असून या  कोंबडीमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असल्यामुळे या कोंबडीला विशेष मागणी आहे. परंतु या जातीच्या कोंबड्यांचे इतर जातींच्या कोंबड्यांच्या तुलनेत खूप कमी वेगात वजन वाढते.

पाच महिन्यात या कोंबड्यांचे वजन फक्त एक किलो होते व दर चक्रात कोंबड्या फक्त साठ अंडी देतात. परंतु या कोंबडीच्या अंड्याला आणि मांसाला भरपूर मागणी असल्यामुळे कडकनाथ पालनासाठी खूप महत्वपूर्ण आहे.

5- आरआयआर- गावरान कोंबड्यांमध्ये प्रसिद्ध असलेली ही जात आहे. परंतु या जातीच्या कोंबड्या पासून मिळणारे अंड्यांचे उत्पादन उशिरा मिळते. गावरान अंड्यांना बाजारपेठेत आणि रिटेल विक्री मध्ये देखील अधिक भाव मिळतो. ही कोंबडी एकाचक्रात 220 ते 250 अंडी देते.

6- ब्लॅक अस्ट्रालॉर्प- ही कोंबडी सगळ्यात महत्त्वाची असून या प्रजातीच्या कोंबडीचे तीन महिन्यात दोन किलो वजन वाढते. तसेच अंडी उत्पादनासाठी देखील ही प्रजाती  चांगले असून एका चक्रात 160 ते 200 अंडी देते.

नक्की वाचा:Poultry:'गिरीराज'देईल पोल्ट्री व्यवसायात आर्थिक समृद्धी,चांगल्या उत्पादनासाठी अशा प्रकारे करा व्यवस्थापन

English Summary: this is so profitable species of deshi hen and get more production to egg
Published on: 29 September 2022, 10:47 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)