पशुपालन व्यवसाय म्हटले म्हणजे सगळ्यात आगोदर डोळ्यासमोर येते ते गाय आणि म्हशीचे पालन हे होय. गाय व म्हैस पालनाच्या माध्यमातून दुधाचे उत्पादन वर सगळी पशुपालनाचे मदार असते. जेव्हा आपण दूध डेअरीला घालतो त्या वेळेस दुधातील स्निग्धांश अर्थात फॅट हे खूप आर्थिक दृष्टीने महत्त्वाची गोष्ट आहे. जर एकंदरीत आपण गाईच्या फॅटचा विचार केला तर तो साडेतीन आणि म्हशीचा 5%गृहीत धरला जातो.
परंतु बऱ्याचदा आपल्याला दिसून येते की, दुधाचा फॅट हा बऱ्याच प्रमाणात कमी लागतो. यामागे तसे पाहायला गेले तर वेगवेगळी कारणे आहेत व ती कारणे पशु पालकांना माहीत असणे देखील तेवढेच गरजेचे आहे. या लेखामध्ये आपण दुधाचा फॅट का कमी लागतो? त्यामागची कारणे कोणती? याबद्दल जाणून घेऊ.
दुधातील फॅट कमी लागण्याची कारणे
1- जनावरांचा आहार हे प्रमुख कारण- जनावरांचा आहार व्यवस्थापन करताना आपण जो काही आहार देतो तो संतुलित आहे का हे पाहणे गरजेचे आहे.बहुतांशी पशुपालक आपल्याकडे जो काही चारा उपलब्ध असतो तो जनावरांना खायला दिला जातो.
त्यामध्ये विचार केला तर कडवळ,ज्वारीचा कडबा किंवा बऱ्याच अंशी आता शेतकरी मुरघासचा वापर करीत आहे. बरेच शेतकरी उसाचे तुकडे करून जनावरांना खायला घालतात. परंतु उसामध्ये साखरेचे प्रमाण असल्याने जनावरांमध्ये साखरेचे प्रमाण वाढते व दुधाचा फॅट कमी होतो.
2- दोन वेळच्या दूध काढण्याच्या वेळेमधील अंतर- आपण सर्वसाधारणपणे दूध काढताना सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन वेळेस काढतो.
परंतु या गोष्टीचा आणि दुधाचा फॅट यांचा खूप घनिष्ठ संबंध आहे.सकाळी आणि सायंकाळी आपण दूध काढताना यामधील अंतर 12 तासांचे असणे खूप गरजेचे आहे. जर या दोनही वेळा तिल अंतर वाढले तर दुधाचे प्रमाण निश्चित वाढते परंतु फॅट कमी लागतो.
नक्की वाचा:आता वाहणार दुधाची नदी! दूधउत्पादकांनो गाई-म्हशींना द्या हा हिरवा चारा, होईल भरघोस दुधवाढ
3- जनावरांचे वय व वेत- जनावरांचे वय ज्या पद्धतीने वाढत जाते, तसतसे दुधातील फॅटचे प्रमाण कमी कमी होत जाते. जनावरांच्या पहिल्या आणि दुसऱ्या म्हणजेच सुरुवातीच्या वेतांमध्ये फॅटचे प्रमाण हे अधिक असते. साधारणपणे सात ते आठ वेतानंतर फॅटचे प्रमाणात लक्षणीय घट होते.
4- ऋतूनुसार बदल- आपल्याला माहित आहेच की पावसाळ्यात शेताच्या बांधाला खूप हिरवा चारा उपलब्ध होतो.गवत कापून जनावरांना आहार म्हणून दिले जाते.
एवढेच नाही तर हिवाळ्यात देखील हिरवा चारा खूप प्रमाणात उपलब्ध असतो.यामुळे दुधाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होतेच परंतु फॅटचे प्रमाण कमी होते.
याउलट परिस्थिती उन्हाळ्यामध्ये असते. उन्हाळ्यामध्ये कोरडा चाराचा समावेश जास्त प्रमाणात जनावरांच्या आहारात केल्याने दुधातील फॅट वाढलेली दिसते.
5- दुधातील भेसळ- दुधामध्ये काही भेसळ केली तर त्याचा परिणाम दुधाचे फॅट कमी होण्यावर होतो. बरेच जण दुधात पाणी मिक्स करतात. त्यामुळे दुधातील घटकांचे प्रमाण कमी होते तसेच दुधाची भुकटी जर मिक्स केली तर दूध दिसायला घट्ट दिसते परंतु फॅट कमी लागते.
Published on: 29 July 2022, 11:16 IST