Animal Husbandry

बरेच शेतकरी बंधू शेतीसोबत जोडधंदा म्हणून शेळीपालन व्यवसाय करतात. आपल्याला माहित आहे की, शेळी पालन व्यवसाय हा कमी खर्चात आणि कमी जागेत चांगला नफा देणारा व्यवसाय आहे. त्यामुळे आता बरेच शेतकरी तसेच नवयुवक या व्यवसायाकडे आकृष्ट होताना दिसत आहेत.

Updated on 20 August, 2022 2:33 PM IST

बरेच शेतकरी बंधू शेतीसोबत जोडधंदा म्हणून शेळीपालन व्यवसाय करतात. आपल्याला माहित आहे की, शेळी पालन व्यवसाय हा कमी खर्चात आणि कमी जागेत चांगला नफा देणारा व्यवसाय आहे. त्यामुळे आता बरेच शेतकरी तसेच नवयुवक या व्यवसायाकडे आकृष्ट होताना दिसत आहेत.

तसे पाहायला गेले तर प्रत्येक व्यवसायाच्या बाबतीत व्यवस्थापन आणि काही मूलभूत गोष्टींकडे काटेकोरपणे लक्ष दिले व त्या पद्धतीने नियोजन केले तर संबंधित व्यवसायामध्ये यश मिळतेच व हीच बाब शेळीपालन व्यवसायाला देखील लागू होते. या लेखामध्ये आपण शेळीपालन व्यवसायाशी काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊ, जेणेकरून त्यामुळे शेळीपालन व्यवसायात यश मिळवणे सोपे होते.

नक्की वाचा:Animal care:'लेप्टोस्पायरोसिस' आहे दुभत्या जनावरांचा कर्दनकाळ,म्हणून रहा अलर्ट आणि घ्या काळजी

 शेळीपालन व्यवसायातील यशासाठी आवश्यक गोष्टी

1- शेळीपालन व्यवसायात आल्यानंतर कायम शेळ्यांच्या नवनवीन जातींचा शोध घेऊन त्या जातींचा अभ्यास करत राहणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही बाजारपेठेतील मागणीचा देखील व्यवस्थित अभ्यास करावा व गोठ्यामध्ये दरवर्षी वेगळ्या जातीचा नर आणून त्यांची पैदास करावी.

2- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वेतावर आलेल्या शेळीला एक महिना आणि व्यायल्यानंतर एक महिना गोठ्यामध्ये एक छानसा वेगळा कप्पा तयार करून त्या ठिकाणी तिची राहण्याची व्यवस्था करावी. असे केल्याने शेळीचे दूध देण्याची क्षमता वाढते तसेच नवजात करडू आणि शेळी यामधील जे काही नाते असते ते अधिक दृढ होते त्यामुळे नवजात पिल्ले सशक्त व निरोगी राहतात.

3- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एका महिन्याला एक तारीख निश्चित करून नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी व शिफारस केल्याप्रमाणे पशुवैद्यकांच्या सल्ल्याने लसीकरण करणे खूपच उत्तम ठरते.

4- प्रत्येक तीन महिन्यानंतर एक महिना वयाची काही पिल्ले असतील त्यांना व शेळ्यांना जंत नाशकांचा वापर करून घ्यावा.

5- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शेळ्यांची निगा व स्वच्छता तसेच गोट्याची देखील स्वच्छता ठेवण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कंटाळा करू नये. तसेच तुमच्या फार्ममधील सगळा जमाखर्च व्यवस्थितपणे नोंद करून ठेवावा तसेच शेळ्यांचा जन्म, मृत्यू तसेच विक्री केलेल्या शेळ्यांची योग्य प्रकारे नोंद ठेवावी.

नक्की वाचा:Murghaas Tips:मुरघास बनवा 'अशा' पद्धतीने, टिकेल जास्त दिवस आणि जनावरे राहतील निरोगी

6- आरोग्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शेळ्यांना पाणी व्यवस्थापन करताना पाणी साठवण्याची जागा स्वच्छ असावी तसेच पिण्याचा मुबलक व स्वच्छ पुरवठा असणे गरजेचे आहे. पाणी साठवण्याचे टाकी अथवा हौद नियमितपणे स्वच्छ करून द्यावा.

7- शेळीपालनातील एक महत्त्वाचे चांगला नफा मिळविण्याचे तंत्र म्हणजे जर शेळ्या अर्धा वाटा पद्धतीने सांभाळायला दिल्या तर त्या माध्यमातून तुम्हाला कुठलाही खर्च न करता उत्पन्न सुरू होते व अशा पद्धतीने जर तुम्ही पंचवीस वेळा शेतकऱ्यांना देण्याचे नियोजन केले तर ते फारच फायद्याचे आणि जास्त नफा देणारे ठरू शकते.

8- जर तुम्ही शेळ्यांच्या आहारामध्ये झाडाची कोवळी पाने तसेच फांद्या व शेंगा खायला दिले तर शेळ्या आवडीने खातात कारण शेळ्यांना झाडपाला फार आवडतो.

9- जे करडांचे वजन 15 किलोच्या पुढे होते अशांना 100 ग्रॅम कडबाकुट्टी तसेच वाळलेला चारा द्यावा व पुढील प्रत्येक पाच किलो वजनास 50 ग्रॅम या दराने हे प्रमाण वाढवावे.

नक्की वाचा:भारीच की! शेळीपालनासाठी मिळणार लाखांपर्यंतचे कर्ज; नाबार्डकडूनही मिळतंय अनुदान

English Summary: this is important and essential thinks for success in goat rearing
Published on: 20 August 2022, 02:33 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)