Animal Husbandry

सध्या राज्यात दुधाच्या उत्पादनात घट झाली आहे. सध्या तीस लाख लिटरचा तुटवडा जाणवत असल्याले केवळ दूध आणि दूधाच्या पावडरचेच नाही तर दूधापासून बनणाऱ्या इतर पदार्थांचे दर देखील वाढले आहेत. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात दूधाता तुटवडा सध्या अधिक जाणवत आहे. यामुळे याचे दर सध्या अजून वाढण्याची शक्यता आहे.

Updated on 30 April, 2022 11:52 AM IST

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. असे असताना सध्या राज्यात दुधाच्या उत्पादनात घट झाली आहे. सध्या तीस लाख लिटरचा तुटवडा जाणवत असल्याले केवळ दूध आणि दूधाच्या पावडरचेच नाही तर दूधापासून बनणाऱ्या इतर पदार्थांचे दर देखील वाढले आहेत. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात दूधाता तुटवडा सध्या अधिक जाणवत आहे. यामुळे याचे दर सध्या अजून वाढण्याची शक्यता आहे.

दूध पावडरच्या दरात जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. सोबतच दूध, दही, बटर, या पदार्थांच्या दरात देखील वाढ झाली आहे. तसेच पुढे देखील अजून वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच सध्या राज्यासह देशात महागाईचा भडका उडाला आहे. इंधनाच्या (Fuel) दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा मोठा फटका बसत आहे.

तसेच खाद्य तेलापासून सर्वच वस्तुंचे दर वाढल्याने घर चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. असे असताना आता दूधाच्या (Milk) टंचाईमुळे दूध पावडरचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पूर्वी दूध पावडरची किंमत प्रति किलो 125 ते 150 रुपये होती. आता 350 रुपयांवर पोहोचली आहे. यामुळे भारतात लवकरच श्रीलंकेसारखी परिस्थिती येणार का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

दूध पावडरचे दर दुपटीने वाढले आहेत. सध्या राज्यात दररोज सरासरी दीड कोटी दूधाचे उत्पादन होते, त्यापैकी एक कोटी 20 लाख लिटर दूध विविध दूध डेअरी आणि पाऊचच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचते. तर उर्वरित दूधाचे बटर, दही, ताक, अशा उत्पादनासोबतच पावडर तयार केली जाते. यावेळी मात्र ऊन जास्त आहे. यामुळे याचा मोठा परिणाम दूध उत्पादनावर पडला आहे.

जनावरांना खाण्यासाठी हिरवा चारा उलब्ध नसल्याने दूधाच्या प्रमाणत घट झाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून दूधाचे उत्पादन 15 ते 20 टक्के म्हणजेच अंदाजे 30 लाख लिटरने घटले आहे. यामुळे दुधाचे दर देखील वाढले आहेत. यामुळे येणाऱ्या काळात देखील हे दर मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या;
'किसान भागीदारी, प्राथमिकता हमारी', केंद्र सरकारचा उपक्रम शेतकऱ्यांच्या दारी, शेतकऱ्यांना फायदा..
शेतकऱ्यांसाठीही भोंगा वाजवा!! भोंग्याच्या वादात हिंदुस्थान मानव पक्षाची उडी
शेतकऱ्यांनो या फुलाला परदेशातही मोठी मागणी आहे, कमी खर्चात मिळवा मोठा नफा..

English Summary: The price of milk powder has doubled, a big blow to milk scarcity, farmers are likely to get relief ...
Published on: 30 April 2022, 11:52 IST