Animal Husbandry

भारतामध्ये शेतीसोबत पशुपालन व्यवसायफार मोठ्या प्रमाणात केला जातो.भारतातील प्रत्येक राज्यातपशुपालन व्यवसायाच्या माध्यमातून दुधाचे उत्पादनमोठ्या प्रमाणात घेतले जाते.पशुपालन व्यवसायाला उभारी मिळावीयासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात.

Updated on 18 April, 2022 7:23 PM IST

भारतामध्ये शेतीसोबत पशुपालन व्यवसायफार मोठ्या प्रमाणात केला जातो.भारतातील प्रत्येक राज्यातपशुपालन व्यवसायाच्या माध्यमातून दुधाचे उत्पादनमोठ्या प्रमाणात घेतले जाते.पशुपालन व्यवसायाला उभारी मिळावीयासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात.

जेणेकरून पशुपालकांना त्यांच्या व्यवसायात वाढ करण्यासोबतच हातात अधिक उत्पन्न प्राप्त होईल, हा त्यामागचा उद्देश आहे.

नक्की वाचा:पुढील शैक्षणिक सत्रापासून कृषी विद्यापीठांमध्ये UG- PG अभ्यासक्रमांमध्ये नैसर्गिक शेती : ICAR

त्यामुळे पशुपालकांना यासंबंधीचेअत्याधुनिक ज्ञान मिळावेव त्या ज्ञानाचा उपयोग ते आपल्या व्यवसायात करू शकतील या उद्देशाने दूध विकास क्षेत्रातील सर्वोच्च संस्था असलेल्या राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने अर्थात  एनडीडीबीने ऑल इंडिया रेडिओ च्या सहकार्याने खास दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आठवड्यातून दोनदा महत्वपूर्ण  कार्यक्रम प्रसारित करण्यास सुरुवात केली होती.

परंतु आता गुजरात मधील बनासकंठा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघटनेकडून केवळ पशु पालकांसाठी असलेले दूध वाणी नावाचे कम्युनिटी रेडिओ स्टेशनउभारले आहे.या कम्युनिटी रेडिओ स्टेशन चे उद्घाटन उद्याआज दिनांक एकोणवीस एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ; आता खतांचे भाव गगनाला भिडले

पशु पालकांना त्यांच्या व्यवसायात मदत व्हावीया उद्देशाने फक्त आणि फक्त पशु पालकांसाठी हे रेडिओ स्टेशन उभारण्यात आले आहे. बनासकांठा दूध उत्पादक संघटनेच्या बनास डेरीने या रेडिओ स्टेशनची उभारणी केली आहे. 

गुजरात राज्यातील जवळजवळ पाच लाखांपेक्षा अधिक पशुपालकांना याचा फायदा होणार आहे. बनास डेरी हीमोठी डेरी असून दिवसाला तीस लाख लिटर दूध बाजारात विक्रीसाठी पाठवते. एका दिवसाला एक लाख लिटर आईस्क्रीम, 80 टन बटर, 20 टन खवा आणि सहा टननिर्मितीची बनण्याची क्षमता आहे.

English Summary: the first community radio station for pastoralist in banaaskantha
Published on: 18 April 2022, 07:23 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)