Animal Husbandry

दुभत्या जनावरांचे सर्वांगीन व्यवस्थापन होणे गरजेचे असते.यामध्ये जनावरांच्या गोठ्याच्या स्वच्छते पासून तर त्यांचे आहार व्यवस्थापन खूप गरजेचे असते.तुमचे आहार व्यवस्थापन किंवा इतर व्यवस्थापन अचूक आणि तंत्रज्ञान शुद्ध असेल तर दुभत्या जनावरांपासून मिळणारे दूध उत्पादन हे देखील अधिकच असते.

Updated on 12 July, 2022 10:47 AM IST

 दुभत्या जनावरांचे सर्वांगीन व्यवस्थापन होणे गरजेचे असते.यामध्ये जनावरांच्या गोठ्याच्या स्वच्छते पासून तर त्यांचे आहार व्यवस्थापन खूप गरजेचे असते.तुमचे आहार व्यवस्थापन किंवा इतर व्यवस्थापन अचूक आणि तंत्रज्ञान शुद्ध असेल तर दुभत्या जनावरांपासून मिळणारे दूध उत्पादन हे देखील अधिकच असते.

वाढत्या दूध उत्पादनासाठी दुभत्या जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे दुभत्या जनावरांना सकस आणि पौष्टिक चारा पुरवणे गरजेचे आहे. या लेखामध्ये आपण अशाच एका गवता बद्दल म्हणजेच स्टायलो गवताबद्दल माहिती घेणार आहोत.

 खरिपात स्टायलो चारा लागवड

 हे गवत एक बहुवार्षिक चारा पीक असून द्विदल वर्गातील आहे.हे उंचीने अडीच फुटांपर्यंत सरळ प्रमाणात वाढते.या गवताचे सगळ्यात महत्त्वाचे आणि फायदेशीर वैशिष्ट्य म्हणजे याला फुटवे अधिक प्रमाणात येतात.

अगदी कमीत कमी पाण्यात देखील याची वाढ चांगली होते.जर तुम्हाला स्टायलो गवताची लागवड करायची असेल तर ती तुम्ही पाण्याचा चांगला निचरा होणारी, मुरमाड तसेच पडीक जमिनीचा वापर करू शकतात.

नक्की वाचा:पशुजगत:गोठ्यातील जनावरांचा माज ओळखा आणि टाळा होणारे आर्थिक नुकसान, वाचा सविस्तर माहिती

 या गवताच्या मध्ये असणाऱ्या पौष्टिक घटकांचा विचार केला तर यामध्ये प्रथिनांचे प्रमाण 12 ते 15 टक्‍क्‍यांपर्यंत असते. स्टायलो गवत लागवडीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली फुले क्रांती ही जात खूप महत्त्वाचे आहे.

स्टायलो गवताची लागवड पद्धत

 स्टायलो गवत लागवड करण्याआधी जमिनीची खोल नांगरणी आणि दोन कुळवाच्या पाळ्या आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्टायलो गवताची लागवड करण्याअगोदर त्याचे बियाणे गरम पाण्यामध्ये तीन-चार मिनिटे भिजत घालावे.

एका हेक्‍टरसाठी जवळपास दहा किलो बियाणे लागते. रायझोबियम जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करून घेणे गरजेचे आहे.

नक्की वाचा:Cow Information: अगदी कमीत कमी आहारात जास्त दूध देण्याची क्षमता आहे गाईच्या 'या' जातीत, वाचा वैशिष्ट्ये

जेव्हा तुम्ही यांची पेरणी कराल तेव्हा ती एक ठराविक खोलीपर्यंत करणे गरजेचे असून पेरणी करताना 30 बाय 15 सेंटिमीटर अंतरावर करावी.आता चालू कालावधी आहे म्हणजेच जून आणि जुलै यामध्ये या गवताची  पेरणी करता येते.

पेरणी केल्यानंतर जवळजवळ 90 दिवसांनी याची पहिली कापणी होते.कापणी करताना एका गोष्टीची काळजी घ्यावी, ती म्हणजे 10 ते 15 सेंटीमीटर जमिनीपासून वर कापणी करावी.

जेव्हा तुम्ही कापणी कराल तेव्हा वर्षातून दोन कापणी पीक फुलोऱ्यात असताना घ्याव्यात. यापासून एका एकर मध्ये 250 ते 300 क्विंटल चाऱ्याचे उत्पादन मिळते.

नक्की वाचा:महत्वाचे! या 'टिप्स' वापरा आणि ओळखा गोठ्यातील जनावर आजारी आहे की निरोगी

English Summary: stylo grass is so nutritional for animal that give more benifit to cow and buffalo
Published on: 12 July 2022, 10:47 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)