ग्रामीण भागात राहून शेतीसोबत जर तुम्हाला एखादा पूरक व्यवसाय चालू करायचा असेल तर तुम्हाला चालू करण्यास के हरकत नाहीये जे की तुम्ही व्यवसाय चालू करण्यास नशीब अजमावू शकता. आताच्या काळात पाहायला गेले तर पारंपरिक शेतीपेक्षा आरोग्याच्या दृष्टीने जी पिके घेतली जातायत ती खूप महत्त्वाची आहे, कारण बाजारात त्या पिकांची खूप मागणी सुद्धा वाढलेली आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणजे तुम्ही जर जोडधंदा चालू केला तर महिन्याला तुम्ही यामधून लाखो रुपये कमवू शकता.
शेतीला पूरक व्यवसाय म्हणजे अनेक प्रकारचे व्यवसाय आहेत त्यामध्ये एक व्यवसाय मधुमक्षिका पालन व्यवसाय. मधुमक्षिका पालन व्यवसाय सिरी करण्यासाठी तुम्हाला जास्त पैशाची गरजही लागत नाही शिवाय सरकार कडून तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्यास अनुदान सुद्धा भेटते. तुम्ही प्रति महा या व्यवसायातून जवळपास पाच लाख रुपयांची कमाई कमवू शकता.
मधुमक्षिका पालनाचा व्यवसाय नेमका काय?
मधुमक्षिका पालन हा व्यवसाय ग्रामीण भागात अत्यंत चांगल्या प्रकारे व्यवसाय म्हणून पहिला जातो. यासाठी तुम्हाला काय वेगळ्या जागेची गरज नाही लागणार तर तुम्ही तुमच्या शेतीच्या जागेत हा व्यवसाय करू शकता. मध माशांमुळे शेतात जी पिके लावली आहेत त्या पिकांचे सरंक्षण सुद्धा होते आणि त्यामधून उत्पादन सुद्धा वाढण्याची चांगली शक्यता आहे. तुम्हाला जर शेतीला पूरक व्यवसाय म्हणून मधुमक्षिका पालन म्हणून व्यवसाय चालू करायचा असेल तर सरकारकडून तुम्हाला जवळपास ८५ टक्के अनुदान मिळू शकते.
हेही वाचा:दूध व्यवसायासाठी मुक्त संचार गोठा ठरतोय फायद्याचा
मधुमक्षिका पालनातून किती उत्पन्न मिळेल?
तुम्ही कमीत कमी १० पेट्या घेऊन मधुमक्षिका पालन व्यवसाय सुरू करू शकता जे की जर प्रत्येक पेटी मधून जे ४० किलो मध मिळाला तर १० पेटी मधून तुम्हाला ४०० किलो मध मिळू शकतो. प्रति किलो जर तुम्ही ३५० रुपये ने मध विकला तर ४०० किलो मधाचे पैसे १ लाख ४० हजार रुपये झाले. त्यामधून प्रति पेटी ३५०० रुपये खर्च झाला तर १० पेटी चा खर्च ३५००० रुपये झाला म्हणजेच १ लाख ४० हजार रुपये मधून ३५ हजार वजा केले तर तुम्हाला १ लाख ५ हजार रुपये भेटतात.जसे जसे मधमाशांच्या संख्येत वाढ होत जाते तसे तसे तुमच्या व्यवसायात तीन पटीने वाढ होईल. जर वातावरण तसेच पोषक घटक असतील तर प्रति वर्षाला तुम्ही २५ ते ३० पेट्या मधून मधाचे उत्पादन घेऊ शकता.
सरकारकडून आर्थिक मदत उपलब्ध:
मधुमक्षिका पालन हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याला सरकारकडून हनी प्रोसेसिंग प्लान्टस साठी आर्थिक अनुदान भेटते. तुमच्या व्यवसायास जेवढे पैसे लागणार आहेत त्यापैकी ६५ टक्के अनुदान सरकारकडून भेटते यामधून २५ टक्के सबसिडी सुद्धा तुम्हाला मिळते. त्यामुळे तुम्हाला या व्यवसायातून चांगले पैसे मिळतात आणि जास्त भांडवल सुद्धा लागत नाही.
Published on: 11 September 2021, 08:47 IST